Goa Carnival Festival: इमेलियानो डायस यांची ‘किंग मोमो’ म्‍हणून निवड झाली

गोव्यातील प्रसिद्ध कार्निव्हल महोत्‍सव येत्या शनिवारपासून पणजी येथे सुरू होत आहे.
Goa Carnival Festival 2022
Goa Carnival Festival 2022 Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील प्रसिद्ध कार्निव्हल महोत्‍सव येत्या शनिवारी पणजीतून सुरू होत आहे. त्‍यासाठी ‘किंग मोमो’ म्हणून राय-मडगाव येथील इमेलियानो पी. डायस यांची निवड झाली आहे. कार्निव्हल मिरवणुकीचे नेतृत्व त्यांच्याकडे देण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत झाला. किंग मोमोसाठी पर्यटन खात्याकडे सहा अर्ज आले होते.

Goa Carnival Festival 2022
साल नदीतील गाळ काढण्यास पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध

या बैठकीचे अध्यक्ष तथा पर्यटन संचालक मिनिनो डिसोझा यांनी माहिती देताना सांगितले की, ही निवड करताना व्यक्तिमत्व, त्‍यांची पार्श्‍वभूमी, बोलण्याची लय, समाजामधील त्यांची कामगिरी आदी निकष लावण्यात आले होते. सर्वांचे चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल आज बैठकीसमोर ठेवण्यात आला होता. त्‍यात शेवटी इमेलियानो डायस यांनी बाजी मारली आणि त्‍यांची किंग मोमो म्‍हणून निवड झाली.

या बैठकीला पणजी महापालिकेबरोबरच मडगाव, मुरगाव व म्हापसा पालिकांचे मुख्याधिकारी तसेच पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

Goa Carnival Festival 2022
गोव्याच्या 'ओरबिन' ला ‘सरफोजी राजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’

कार्निव्हल महोत्सवासाठी किंग मोमो म्हणून आपली निवड व्हावी हे आपले स्वप्न होते. ते पूर्ण झाल्‍याबद्दल खूप आनंद झाला. ऑडिशनवेळी काही चित्रपटांतील डायलॉग सादर केले होते. दोन-तीन चित्रपटांत लहान भूमिका केल्या आहेत. कार्निव्हल मिरवणुकीचे नेतृत्व करण्यास मी खूप खूष आहे. गोव्यातील ही कार्निव्हल परंपरा अशीच अनेक वर्षे सुरूच रहावी. लोकांनी सुरक्षित राहून महोत्सवाचा आनंद घ्यावा. तसेच कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

- इमेलियानो डायस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com