Lightning Strike Goa: ट्युशन सुरु असताना घरावर कोसळली वीज; तिघेजण जखमी, वीज उपकरणे जळून खाक

Goa Lightning Strike: दैव बलवत्तर म्हणून या मुलांना वीजेचा केवळ सौम्य झटका बसला.
Lightning Strike Goa: ट्युशन सुरु असताना घरावर कोसळली वीज; तिघेजण जखमी, वीज उपकरणे जळून खाक
Lightning Strike Goa House Three InjuredDainik Gomantak
Published on
Updated on

Lightning Strike Goa

फोंडा: बुधवारी (ता.२१) सायंकाळी मोठ्या गडगडाटसह पडलेल्या पावसात उडीवाडा-उसगाव येथे वीज कोसळून साईश तिळवे, अक्षिता तिळवे व अश्विका नाईक जखमी हे तिघे झाले. यावेळी घरातील वीज उपकरणे जळून खाक झाली तसेच घराशेजारी असलेल्या कारचा पुढील आरसा फुटला. त्यामुळे दोन घरांतील मिळून तीन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली.

House Hit by Lightning in Usgao
House Hit by Lightning in UsgaoDainik Gomantak

घरमालक अशोक नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास मोठ्या गडगडाटसह घरावर वीज कोसळली त्यामुळे घरातील विजेवर चालणारी सर्व उपकरणे जळून गेली व घरातील तिघांना विजेचा झटका लागला.

House Hit by Lightning in Usgao
House Hit by Lightning in UsgaoDainik Gomantak

आमच्या घरात ट्युशनसाठी लहान मुले आली होती. अभ्यास करीत असताना ही घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून या मुलांना सौम्य झटका बसला.

Lightning Strike Goa: ट्युशन सुरु असताना घरावर कोसळली वीज; तिघेजण जखमी, वीज उपकरणे जळून खाक
Varsha Usgaonker: गोव्याची प्रसिद्ध अभिनेत्री गाजवतेय मराठी बिग बॉस
House Hit by Lightning in Usgao
House Hit by Lightning in UsgaoDainik Gomantak

ही घटना समजताच स्थानिक पंच रेश्मा माठकर यांनी त्या ठिकाणी धाव घेतली तसेच याची कल्पना या मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री विश्वजीत राणे यांना दूरध्वनीवरून दिली. मंत्री राणे यांनी जे काही नुकसान झाले आहे त्यासाठी सहकार्य करणार आहे, असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com