Leopard in Goa: राज्यभर बिबट्याची दहशत! मये, बोरीनंतर आता नार्वेतही संचार

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..
Leopard in Goa
Leopard in GoaDainik Gomantak

Leopard in Goa: बोरीमध्ये बिबट्या खुलेआम फिरत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मये पाठोपाठ आता जवळपासच्या नार्वे गावात बिबट्याचा संचार असल्याची माहिती मिळाली आहे.

Leopard in Goa
Bardez Rto : फॅन्सी, व्हीआयपी नंबरमुळे बार्देश आरटीओ ‘मालामाल’; वर्षभरात मिळवला 6.30 कोटी रुपयांहून अतिरिक्त महसूल

काल (गुरुवारी) मध्यरात्री भर लोकवस्तीत बिबट्याचे दर्शन घडले. कामावरून घरी परतताना गावकरवाडा परिसरात भर रस्त्यावर हा बिबट्या दोघा युवकांच्या नजरेला पडला. बिबट्याचा संचार असल्यामुळे स्थानिकांत भीती पसरली असून, या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने सापळा लावावा,अशी मागणी होत आहे.

अडीच महिन्यांपूर्वी मये परिसरात बिबट्याचा संचार होता. या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने सापळाही मात्र बिबट्या त्यात काही अडकला नाही. त्यानंतर आता नार्वे गावात बिबट्याचा संचार असल्याची माहिती मिळाली आहे. बिबट्याची दहशत वाढण्यापूर्वीच त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com