Margao To Belagavi Bus: कंदब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने नवीन शटल बससेवा सुरु केली आहे. ही शटल बससेवा अगदी खास असणार आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेता केटीसीएलने ही नवी बससेवा सुरु केली आहे. मात्र आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नेमकी ही नवीन बससेवा कोणत्या मार्गावर सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याचे वेळापत्रक आणि तिकीट दर काय असणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या नवीन बससेवेविषयी...
दरम्यान, कंदबची ही शटल बससेवा मडगाव ते बेळगाव व्हाया फोंडा, मार्शेल आणि साखळी अशी असणार आहे. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा नवीन अतिरिक्त पर्याय असणार आहे. मडगाववरुन ही बस सकाळी सात वाजता सुटेल आणि बेळगावला 11 वाजता पोहोचेल. तर बेळगावहून ही बस दुपारी चार वाजता सुटेल आणि मडगावला रात्री 8. 30 वाजता पोहोचेल. प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाणार आहे.
दुसरीकडे, या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किती तिकीट आकारले जाणार याविषयीही केटीसीएलने सविस्तर सांगितले आहे. तुम्ही मडगावरुन बेळगावसाठी जाणार असाल तर तुम्हाला 170 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोर तुम्ही फोंड्याहून बेळगावसाठी जात असाल तर तुम्हाला 150 रुपये मोजावे लागतील. याशिवाय, मार्शेल आणि साखळीवरुन तुम्ही बेळगावला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनुक्रमे 140 रुपये द्यावे लागतील. प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार नाही याचा विचार करुन हे तिकीट दर निश्नित करण्यात आले आहेत.
मडगाव ते बेळगाव बससेवा- व्हाया फोंडा, मार्शेल आणि साखळी मार्गे.
मडगावहून-बेळगाव -170
फोंड्याहून-बेळगाव-150
मार्शेलहून-बेळगाव-140
साखळीहून-बेळगाव-`140
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.