..तरीही 'कोकणी'च्या अस्तित्वाचा लढा संपलेला नाही! 62व्या भाषा मंडळाच्या वर्धापनदिनी शिक्षणतज्ञ देसाईंचे उद्गार

Konkani Bhasha Mandal Goa: स्वागतपर भाषणात कोकणी भाषा मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षा रत्नमाला दिवकर यांनी रोमी लिपी कोकणीला राजभाषेचा दर्जाची मागणी करणाऱ्यांचा समाचार घेतला
Konkani Bhasha Mandal Goa: स्वागतपर भाषणात कोकणी भाषा मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षा रत्नमाला दिवकर यांनी रोमी लिपी कोकणीला राजभाषेचा दर्जाची मागणी करणाऱ्यांचा समाचार घेतला
Konkani Bhasha Mandal Dainik Gomantak
Published on
Updated on

Konkani Bhasha Mandal 62nd Anniversary

सासष्टी: कोकणी भाषेला साहित्य अकादमीची मान्यता मिळाली, कोकणी गोव्याची राजभाषा झाली, गोव्यात साहित्य निर्मितीला चालना मिळत आहे, तरीही कोकणीच्या अस्तित्वाचा लढा अजून संपलेला नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. नारायण भा. देसाई यांनी आज केले. कोकणी भाषा मंडळाच्या ६२ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

हा सोहळा मडगावच्या रवींद्र भवनच्या मुख्य सभागृहात आज सकाळी झाला. त्यावेळी कोकणी भाषा मंडळाच्या विविध पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी सदानंद काणेकर, राजू मेघश्याम नायक, डॉ. सबिना मार्टिन्स व दीप कारापुरकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

आमच्या गोव्याची माती भाषा, विचार, विवेक व स्वप्न यांच्या अधारावर मजबूत व्हायला पाहिजे. कोकणीच्या अस्तित्वासाठी गोव्याचे मुंबई होणे थांबले पाहिजे व त्यासाठी कोकणी भाषा मंडळाने पुढाकार घ्यावा, असे डॉ. देसाई यांनी सूचित केले.

साहित्य अकादमीने कोकणीला मान्यता दिली आहे. इतरांना वाटते तर ते म्हणतात, तसे आपल्या मागणीसाठी न्यायालयातही जाऊ शकतात,असे रत्नमाला दिवकर यांनी सांगितले.

Konkani Bhasha Mandal Goa: स्वागतपर भाषणात कोकणी भाषा मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षा रत्नमाला दिवकर यांनी रोमी लिपी कोकणीला राजभाषेचा दर्जाची मागणी करणाऱ्यांचा समाचार घेतला
Romi Konkani: ‘खुर्ची हवी की रोमी कोकणी’ घोषणेवरुन वाद, कुडतरीचे आमदार म्हणाले, आम्हाला जनतेनं निवडून दिलंय, विसरू नका!

रोमीच्या विरोधात नाही!

स्वागतपर भाषणात कोकणी भाषा मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षा रत्नमाला दिवकर यांनी रोमी लिपी कोकणीला राजभाषेचा दर्जाची मागणी करणाऱ्यांचा समाचार घेतला. त्यांनी सांगितले की कोकणी भाषा मंडळ किंवा संस्थेचे कार्यकर्ते रोमी कोकणीच्या मुळीच विरोधात नाही. कोकणी भाषा मंडळ रोमी कोकणी संस्थांबरोबरही कार्य करीत आहे. त्यांचा दुजाभाव कधी करीत नाही. तरी रोमी कोकणीची मागणी करणाऱ्यांनी आमच्या सोशिकतेचा पण अंत पाहू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com