Konkan Railway : तीन रेल्वे स्थानकांवर नियंत्रण कक्ष; पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

Konkan Railway : वैद्यकीय पथकांची व्यवस्था
 Railway
Railway Dainik Gomantak

Konkan Railway :

सासष्टी, पावसाळ्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी कोकण रेल्वेने सज्जता ठेवली आहे. मडगावसह तीन रेल्वे स्थानकांवर नियंत्रण कक्ष उघडले आहेत. त्यात बेलापूर व रत्नागिरी रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे.

मडगाव येथील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असेल. सहा स्थानकांवर वैद्यकीय पथकांची व्यवस्था केली आहे. वेर्णा स्थानकावर अपघात निवारण ट्रेन व प्रमुख नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा बसविली आहे.

या मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. तसेच भूस्खलन होऊन रेल्वे रूळांना धोका निर्माण होतो, असा अनुभव असल्याने देखरेख, गस्त, दुरुस्ती, आपत्कालीन व्यवस्था यावर लक्ष केंद्रीत करण्यावर भर देण्यात येत आहे. ही माहिती कोकण रेल्वेतर्फे अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकामार्फत दिली.

कोकण रेल्वे मार्गावरील पाण्याचा निचरा, पायाभूत सुविधांची देखभाल, कॅच वॉटर ड्रेनेजची स्वच्छता, रेल्वे कटिंग्जची तपशीलवार तपासणी करण्यात येत असल्याने या मार्गावरील दरड कोसळण्याचे प्रकार कमी झाले असले तरी कोकण रेल्वे कोणताही धोका पत्करणार नाही.

प्रवाशांच्या सेवेसाठी १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत खास वेळापत्रक जारी केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी नियमित www.konkanrailway.com किंवा १३९ नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

 Railway
Goa Hit And Run Case: चालत घरी जाताना भरधाव ट्रकने चिरडले, फरार चालकाला अटक

मॉन्सून हंगामासाठी खास गाड्यांची व्यवस्था

ट्रेन क्रमांक ०११७१ व ०११७२ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी व सावंतवाडी ते मुंबई छत्रपती महाराज टर्मिनस - ०११७१ गाडी मुंबई स्थानकावरून २२ रोजी पहाटे १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल व त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता सावंतवाडीला पोहोचेल. ०११७२ क्रमांकाची गाडी सावंतवाडीहून २२ रोजी दुपारी ३.१० वाजता सुटेल व मुंबईला २३ रोजी पहाटे ४.३५ वाजता पोहोचेल, असे कळविले आहे.

 Railway
Goa Top News: उसगावात दोन अपघात, पर्वरी उड्डाणपूल, कुळे येथील आग; गोव्यातील ठळक बातम्या

२४ तास गस्तीसाठी ६७२ जवान तैनात

कोकण रेल्वे मार्गावर गस्तीत वाढ केली असून ६७२ जवान तैनात केले आहेत. हे जवान २४ तास गस्त घालणार आहेत. ९ रेल्वे स्थानकांवर टॉवर वॅगन्स तयार ठेवल्या असून त्याद्वारे आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यांना वॉकी टॉकी, मोबाईल फोन्स दिले आहेत. या नऊ स्थानकांमध्ये वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकळ, उडुपी यांचा समावेश आहे.

दुरुस्ती कामामुळे काही रेल्वे फेऱ्या रद्द

सावर्डे ते कालेदरम्यान पीक्युआरएस ब्लॉक तसेच कुळे ते काले व कासावली ते वास्को दरम्यानच्या मार्गावर दुपदरीकरणाचे काम सुरु केल्याने काही प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. ट्रेन क्रमांक ०७३८० कुळे ते वास्को व ०७३७९ वास्को ते कुळे. या दोन्ही प्रवासी गाड्या २१ जून ते १७ ऑगस्ट २०२४ पर्यंत रद्द केल्या आहेत. या रेल्वे गाडीने नियमित प्रवास करणाऱ्यांनी दखल घ्यावी, असे कळविले आहे.

अधिक माहिती व तिकीट आरक्षणासाठी

www.enquiry.indianrail.gov.in

या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीईएस ॲप डाऊनलोड करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com