Karul Ghat Closure: गोव्याला येणारा महत्वाचा करुळ घाट तब्बल 70 दिवस राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Karul Ghat Closure: कोल्हापूर ते कोकणला जोडणारा करुळ घाट रस्त्याच्या कामासाठी सोमवार पासून बंद ठेवण्यात येणार आहे.
Karul Ghat
Karul GhatDainik Gomantak

Karul Ghat Closure: कोल्हापूर ते कोकणला जोडणारा करुळ घाट रस्त्याच्या कामासाठी सोमवार पासून बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून, हा घाट 31 मार्चपर्यंत पूर्ण बंद राहणार आहे. भुईबावडा घाटमार्गे केवळ प्रवासी वाहतूक तर महामार्गावरील अवजड वाहतूक फोंडा आणि अणुस्करा घाटमार्गे सुरू ठेवण्यात येणार आहे.

Karul Ghat
Goa Crime News: वास्‍को जळीतकांड; नवा मुद्दा समोर शिवानी तडफडत होती आणि अनुराग...

कोल्हापूरमधून गोव्याला येण्यासाठी गगनबावडामार्ग सोयीचा असल्याने या मार्गावर अनेकांची गर्दी असते. मात्र करुळ घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याने. हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

करुळ घाटातील रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक करणे अशक्य आहे. करुळ घाट दोन जानेवारीपासून पूर्ण बंद ठेवण्यास जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी परवानगी दिली आहे. हा मार्ग 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.

करुळ घाट एकूण 70 दिवस बंद असल्यामुळे
या मार्गावरील अवजड वाहतूक फोंडाघाट आणि अणुस्करा घाटमार्गे वळविण्यात येणार आहे. भुईबावडा घाटमार्गे केवळ प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.


असे आहेत पर्यायी मार्ग

फक्त प्रवासी वाहतूकीसाठी

  • तळेरे-भुईबावडा-गगनबावडा-कळे-कोल्हापूर: अंतर 107 किलोमीटर

अवजड वाहतूकीसाठी

  • तळेरे-फोंडाघाट-राधानगरी-ठिकपुर्ली-कळंबा-कोल्हापूर: अंतर 123 किलोमीटर

  • तळेरे-वैभववाडी-उंबर्डे-तळवडे-अनुस्करा-वाघव-केर्ले-कोल्हापूर: अंतर 128 किलोमीटर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com