Goa Assembly: मूत्रपिंड रुग्ण वाढीच्या कारणांचा शोध घेणार; आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

Vishwajit Rane: बदलती जीवनशैली, मधुमेह व रक्तदाब हे मूत्रपिंड आजाराला कारणीभूत आहेत
Vishwajit Rane: बदलती जीवनशैली, मधुमेह व रक्तदाब हे मूत्रपिंड आजाराला कारणीभूत आहेत
Vishwajit Ranefreepressjournal
Published on
Updated on

पणजी: राज्यात दिवसेंदिवस मूत्रपिंड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या तीन वर्षात सरासरी दरवर्षी ‘गोमेकॉ’ त एक हजार मूत्रपिंड रुग्‍ण नोंद होत आहेत. इतर तालुक्यांच्या तुलनेत काणकोण तालुक्यात या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यामागील कारणांचा अभ्यास करण्यासाठी केंद्रातील संशोधन संस्थेला ऑगस्ट महिन्यात पाचारण करण्यात येईल.

बदलती जीवनशैली, मधुमेह व रक्तदाब हे मूत्रपिंड आजाराला कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यासंदर्भात जागृती करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज प्रश्‍नोत्तराच्या तासावेळी विधानसभेत दिली.

गेल्या तीन वर्षात किती मूत्रपिंड रुग्णांची नोंद झाली आहे व कोणत्या वयोगटात हे प्रमाण अधिक आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत, असा प्रश्‍न आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केला. मूत्रपिंड रुग्णांची तपासणी तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध काही लहानसहान चुकांसाठी आरोग्यमंत्र्यांनी आक्रमक निर्णय घेऊ नये अशी विनंती त्यांनी केली.

डॉक्टर्सची कमतरता आहे त्याला मंजुरी मिळत नाही ते तुमच्या दोघांमधील असलेले मतभेद त्याला जबाबदार आहेत, असा टोमणा आमदार विजय सरदेसाई यांनी हाणला. काणकोणमधील मूत्रपिंड रुग्णंचे प्रमाण अधिक असल्याचा विषय गंभीर असून त्याचे मूळ कारण शोधण्याची गरज आहे, असे काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर म्हणाले.

Vishwajit Rane: बदलती जीवनशैली, मधुमेह व रक्तदाब हे मूत्रपिंड आजाराला कारणीभूत आहेत
Goa Assembly: गोमेकॉतील ओपीडी गोदामे मी स्वच्छ केली! आरोग्यमंत्री राणेंची कोपरखळी

काणकोणात ४४२ लोकांमागे १ रुग्ण

‘गोमेकॉ’त २०२१ - २२ यावर्षी ८८३, २०२२-२३ यावर्षी १००५ तर २०२३ - २४ यावर्षी १२१० मूत्रपिंड रुग्णांची नोंद झाली आहे. हा आजार ४० ते ८० वयोगटातील पुरुषांमध्ये अधिक आढळून येत आहे. काणकोण तालुक्यात २० ते २५ वयोगटातील लोकांमध्ये हा आजार होत आहे. काणकोण तालुक्यात ४४२ लोकांच्यामागे एक डायलेसिस रुग्ण आहे. तर सत्तरीमध्ये १८३२ लोकांमध्ये एक रुग्ण तसेच साखळीत १७३२ लोकांमागे १ असे प्रमाण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com