Khandola News : दैनंदिन कार्यासाठी प्रत्येकाने पंचांग शिकले पाहिजे : धर्मभूषण ब्रह्मेशानंदाचार्य

Khandola News : तपोभूमीवर पंचांगाबाबत बटू व भाविकांना मार्गदर्शन
Khandola
KhandolaDainik Gomantak

Khandola News :

खांडोळा, रोजच्या दैनंदिनीसाठी प्रत्येक हिंदूस पंचांग वाचता आले पाहिजे, पंचांग पाहता आले पाहिजे.

आम्ही सर्वांनी हाच संकल्प करायचा आहे, की यावर्षी सगळ्यांनी पंचांग कसे पाहायचे असत, तिथी कशी पहायची असते, नक्षत्र कसे पाहायचे असते, ते सर्वांना समजले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी पंचांगाचे ज्ञान घ्यावे, असे आशीर्वचनपर संबोधन धर्मभूषण ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले.

श्री क्षेत्र तपोभूमीवर सर्व शिष्य व भक्तगण व हिंदू धर्मियांसमवेत विशेष कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी पूज्य स्वामीजी संबोधित करत होते.

स्वामी म्हणाले, गणपती हा विद्येचा देव याला विद्येची देवता म्हणतात पंचांगस्थ गणपती म्हणजे पंचांगातली विद्या आणि ही विद्या आपल्याला अंदाज कसा घ्यायचा ते शिकवते. पंचांग म्हणजे ज्योतिष विद्या आहे.

Khandola
Goa Daily News Wrap: सांगोल्डा कारवाई, लोकसभा निवडणूक, गुन्हे; राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा

जी डोळ्यांपासून तयार झालेली आहे आणि जो माणूस तेजस्वी असतो, तो लगेच अंदाज काढतो. हे पंचांग म्हणजे अंदाज काढणे, हिशेब घ्यायचा असेल, जर आढावा घ्यायचा असेल, समजून घ्यायचे असेल तर पंचांग हा विषय शिकावा. हे पंचांग, ज्योतिष शिकण्यासारखा विषय आहे.

गुरुपीठाचे वैदिक शिष्य, प्रशिक्षित पुरोहित यांच्या पौरोहित्याखाली ध्वजपूजन, पूज्य पूजन, ग्रंथवाचन व तद्नंतर पूज्य सद्गुरु आशीर्वचन, आरती, दर्शन, कडूनिंब प्राशन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्यास अँड. ब्राह्मीदेवी, संचालक मंडळ व समस्त शिष्यगण उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com