Pali News : खांडेपार नव्या पुलाचा जोडरस्ता लवकरच होणार खुला; काम जोरात सुरू

Pali News : प्रकल्प सहा वर्षांपासून रखडला होता, वाहतूक सुरळीत होणार
Pali
PaliDainik Gomantak

Pali News :

पाळी, खांडेपार येथील नवीन पुलाचा कुर्टी भागाकडील जोडरस्त्याचे काम जोरात सुरू असून येत्या महिन्यात हा रस्ता खुला होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

गेली सहा वर्षे या पुलाच्या जोडरस्त्याचे काम रखडले होते, मात्र आता हे काम सुरू असून निर्धारित वेळेत हा जोडरस्ता खुला होणार आहे.

खांडेपार येथील नवीन पुलाची आवश्‍यकता निर्माण झाल्यानंतर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी या पुलाच्या कामाला चालना दिली होती. त्यापूर्वी फोंड्याचे आमदार तथा विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक यांनी या पुलासाठी पाठपुरावा केला होता, त्यामुळे या पुलाच्या कामाला मंत्री सुदिन ढवळीकर व मंत्री रवी नाईक यांच्यामुळे चालना मिळाली होती.

खांडेपारचा नवीन पूल पूर्ण होऊन खुला झाला तरी कुर्टी भागाकडील जोडरस्ता पूर्ण झाला नव्हता, त्यामुळे पुलाच्या खालून असलेल्या जोडरस्त्याने वाहतूक वळवण्यात आली होती.

या जोडरस्त्याच्या कामात एक प्राचीन घर येत असल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते, पण नंतरच्या काळात हे प्रकरण मिटल्यानंतर जोडरस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि आता येत्या महिन्यात हा जोडरस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

मध्यंतरीच्या काळात नवीन पूल बांधण्यापूर्वी जुन्या एकेरी वाहतुकीच्या पुलावरून वाहतूक सुरू असल्याने या पुलावर कायम वाहतूक कोंडी व्हायची.

या कोंडीत नित्य कामाला जाणारे कामगार तसेच विद्यार्थी वर्ग अडकून पडत असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता, पण नंतरच्या काळात नवीन खांडेपार पूल बांधून खुला झाल्यामुळे खांडेपार बाजारातील वाहतूक कोंडीची समस्या मिटली होती, पण जोडरस्त्याचे काम अडून राहिल्याने अपघातही झाले होते, त्यात काही जीवघेणे ठरले होते.

आता पुलाच्या जोडरस्त्याचे काम पूर्णत्वास येत असल्याने वाहनचालक तसेच प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Pali
Goa Tourism: गोव्याच्या ‘पर्यटन’ला डिजिटल प्रचाराचे पाठबळ; ‘अगोडा’शी सामंजस्य करार

भुयारी मार्गाचे काम सुरू

फोंड्यातील शापूर - बांदोडा भुयारी मार्गाचे काम सुरू असून हे कामही येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शापूर - फोंडा येथील प्राचीन मशिदीमुळे या ठिकाणी भुयारी मार्ग शक्य नसल्याने वाहतुकीचा गोंधळ निर्माण झाला होता, पण आता हे कामही सुरू करण्यात आले असून शापूर - बांदोडा भुयारी मार्ग कदंब बसस्थानकाला जोडण्यात येणार असल्याने वाहतुकीची मोठी समस्या निकाली निघणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com