गोवा सीमा लगतच्या पश्चिम घाटातील धबधब्यांवर पर्यटकांना बंदी, खानापूर वनविभागाचा निर्णय

धबधब्यांवर तरुणांची वाढती गर्दी आणि अलिकडे घडलेले अपघात लक्षात घेता वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.
 Sural Falls | Karnataka-Goa border
Sural Falls | Karnataka-Goa border
Published on
Updated on

Khanapur Forest imposes ban on tourists visiting waterfalls

खानापूर (बेळगाव) वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धबधब्यांवर वाढती गर्दी आणि दुर्घेटना लक्षात घेता महत्वाचा निर्णय घेतला आहे. वनविभागाने पश्चिम घाट भागातील धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे. धबधब्यांवर तरुणांची वाढती गर्दी आणि अलिकडे घडलेले अपघात लक्षात घेता वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.

पावसाळा सुरू होताच, बेळगाव आणि गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम घाट क्षेत्रातील धबधबे आणि निसर्ग अधिक सुंदर व आकर्षक झाला आहे. धबधबे आणि निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी विशेषत: बेळगाव आणि शेजारील राज्यातील तरुण मोठ्या प्रमाणावर येत असतात.

धबधब्यांना भेट देणारे पर्यटक नियम आणि सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. अनेक तरुण धबधब्यात पोहण्याचा प्रयत्न करतात किंवा सेल्फी घेताना तोल गमावतात. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होतात. अनेकांना दुखापत होते किंवा जीव गमवावा लागतो.

बेळगाव येथे गुरुवारी घडलेल्या घटनेत एका तरुणाला जीव गमवावा लागला. दरम्यान या घटनेची दखल घेत कणकुंबीच्या वन अधिकाऱ्यांनी पर्यटकांना धबधब्यांवर प्रवेशास बंदी घातली आहे.

 Sural Falls | Karnataka-Goa border
Electrify Goa Rally: गोव्यात 'इलेक्ट्रिफाय गोवा' रॅलीचे आयोजन; दिवस, ठिकाण, उद्देश जाणून घ्या

खानापूर गोवा सीमेवर असलेल्या माण गावाजवळील शिंबोली धबधब्यावर ही घटना घडली. बेळगाव येथील 16 वर्षीय तरुण मित्रांसह या धबधब्यावर गेला होता. या धबधब्याची पायवाट धोकादायक असून, गावकरीही येथे जाण्याचे टाळतात.

सर्व धबधब्यांवर बंदी दर्शविणारे फलकही लावण्यात आले असून कोणी आदेशाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वनविभागाने दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com