Karapur Panchayat : डिचोली, कारापूर-सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेस ग्रामस्थांकडून अल्प प्रतिसाद मिळतानाच अकरापैकी तब्बल सहा पंच सदस्यांनीही ग्रामसभेकडे पाठ फिरवली. ग्रामसभेसाठी एकही लेखी प्रश्न किंवा सूचना आली नव्हती.
त्यामुळे अध्यक्षाच्या परवानगीने मोजकेच परंतु महत्त्वाचे विषय उपस्थित झाले. सकाळी १०.३० वाजता सुरू झालेली ही ग्रामसभा तासाभरात म्हणजेच ११.३० वाजता संपली. कारापूर-सर्वण पंचायतीची ग्रामसभा आज सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सरपंच खारकांडे यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिव सुजाता मोरजकर यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले.
या ग्रामसभेत प्रामुख्याने कोदाळ येथे नैसर्गिक जलस्रोत बुजवून भूखंड विकसित करण्यात येत आहेत. या कामाला वेटलॅण्ड प्राधिकरणाकडून आवश्यक परवाना मिळालेला नाही असा मुद्दा रोहन सावईकर करून हे काम बंद करावे, अशी मागणी केली.
विठ्ठलापूर येथे नव्यानेच उघडण्यात आलेल्या कपड्यांच्या ‘शोरूम’ समोरील रस्ता हा ‘अपघात प्रवण क्षेत्र’ असतानाही त्याठिकाणी बेकायदेशीर आणि बेशिस्तपणे वाहने पार्क करण्यात येतात.
त्यामुळे त्या ठिकाणी अपघातांचा धोका आहे अशी भीती एस. मांद्रेकर यांनी व्यक्त करून संबंधित आस्थापनाला स्वतःची पार्किंग व्यवस्था बंधनकारक करावी, अशी मागणी केली. व्यावसायिक करात वाढ करावी, असा ठरावही ग्रामसभेत घेण्यात आला. या ग्रामसभेत जमीर मागोडकर, विजय मठकर आदींनी चर्चेत भाग घेतला.
ग्रामसभेला बाराच ग्रामस्थ!
आजच्या ग्रामसभेला सरपंचांसह उपसरपंच उज्वला कवळेकर, लक्ष्मण गुरव, योगेश पेडणेकर आणि दिव्या नाईक हे पाच पंच सदस्य उपस्थित होते,
तर तन्वी सावंत, ज्ञानेश्वर बाले, दामोदर गुरव, बीबी आयेशा मागोड, बिंदिया सावंत आणि श्रीमती खारकांडे हे सहा पंच सदस्य अनुपस्थित होते. या ग्रामसभेला जेमतेम १२ ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.