डिचोली, कारापूर-सर्वण पंचायतीचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागल्याने आता या पंचायतीला नवीन सरपंचांचे वेध लागले आहेत.
सत्ताधारी भाजप गटातीलच पंचसदस्यांनी सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांची उचलबांगडी केल्याने या पंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले आहे. त्यामुळे या पंचायतीत सरपंच पदासाठी निवडणूक अटळ असून, पुढील सरपंच कोण? त्याकडे कारापूर-सर्वण वासियांचे लक्ष लागून राहिले आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या गत पंचायत निवडणुकीनंतर दत्तप्रसाद खारकांडे यांची कारापूर-सर्वण पंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती.
सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांच्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव सात विरुद्ध शून्य अशा मतांनी संमत झाल्याने त्यांना सरपंच पदावरून पदउतार व्हावे लागले आहे. कारापूर-सर्वण पंचायतीच्या एकूण अकरापैकी सात पंचसदस्यांनी गेल्या २७ फेब्रूवारी रोजी सरपंच खारकांडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता. या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी गेल्या गुरुवारी पंचायत मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती.
या बैठकीस अविश्वास ठराव दाखल केलेले तन्वी सावंत, बीबी आयेशा मागोड, योगेश पेडणेकर, दिव्या नाईक, दामोदर गुरव, लक्ष्मण गुरव आणि अवनी सावंत हे सात पंचसदस्य उपस्थित होते. तर सरपंच खारकांडे यांच्यासह उपसरपंच उज्वला कवळेकर मिळून चार पंचसदस्य अनुपस्थित होते. बैठकीस निरीक्षक म्हणून गटविकास कार्यालयातील अधिकारी श्री. राणे यांनी काम पाहिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.