Goa News : ‘कल्‍की’मध्‍ये चमकतोय गोमंतकीय ‘ध्रुव’ तारा; छोडी पण महत्वपूर्ण भूमिका

Goa News : ध्रुव शिंक्रे हा मडगावातील हौशी रंगभूमीवर काम करणारा कलाकार व प्रसाद शिंक्रे यांचा पुत्र. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर कलेची आवड जोपासण्‍यासाठी त्‍याने अनुपम खेर अकादमीत जाऊन चित्रपट केलेचे प्रशिक्षण घेतले.
goa
goaDainik Gomantak

सुशांत कुंकळयेकर

पहिल्‍याच दिवशी १९१.५ कोटींचा गल्‍ला जमवून भारतीय चित्रपटसृष्‍टीत एक नवा विक्रम नोंदविणाऱ्या ‘कल्‍की २८९८ एडी’ या चित्रपटाचा सगळीकडे बोलबाला असतानाच गोव्‍यासाठीसुद्धा या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून एक खास खबर लपलेली आहे.

या चित्रपटात छोटीशी का होईना, पण प्रभावी अशी गार्डची भूमिका मडगावातील ध्रुव शिंक्रे याने केली आहे. या ब्‍लॉक बस्‍टर चित्रपटाशी त्‍यामुळेच एका अर्थाने गोमंतकीयांचेही नाते जोडले गेले आहे.

ध्रुव शिंक्रे हा मडगावातील हौशी रंगभूमीवर काम करणारा कलाकार व प्रसाद शिंक्रे यांचा पुत्र. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर कलेची आवड जोपासण्‍यासाठी त्‍याने अनुपम खेर अकादमीत जाऊन चित्रपट केलेचे प्रशिक्षण घेतले. ध्रुव हा सध्‍या पुन्‍हा एकदा गोव्‍यात स्‍थायिक झाला असला तरी मध्‍यंतरीच्‍या काळात मुंबईत त्‍याने अनेक हिंदी आणि इंग्रजी नाटकांत काम करून प्रेक्षकांची वाहव्‍वा मिळविली आहे.

अन्‌ अशी झाली माझी निवड

एकूण सात भाषांमध्‍ये एकाचवेळी रिलिज झालेल्‍या ‘कल्‍की’ या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्‍चन, कमल हसन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी आदी दिग्‍गज कलाकार आहेत. या चित्रपटात खलनायकी स्वरूपाची गार्डची भूमिका ध्रुवने केली आहे.

‘कल्‍की’ चित्रपट करण्‍यापूर्वी ध्रुवने ‘आमिजाद’ या कोकणी चित्रपटात भूमिका केली होती. ‘कल्‍की’बाबत ध्रुव म्‍हणाला, पणजीत ईएसजीमध्‍ये झालेल्‍या शिबिरात माझे ऑडिशन झाले आणि नंतर माझी निवड झाली. ६०० कोटींच्‍या या बिग बजेट चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबाद येथे झाले.

goa
बाजारात Nifty 17 हजारांच्या पार, ACC, कीटकनाशके, L&T इन्फोटेक फोकसमध्ये

चित्रिकरणादरम्‍यानचे माझे अनुभव फार आनंददायी होते. दोन भाषांमध्‍ये माझे संवाद मुद्रित केले गेले. सुरूवातीला हिंदीत तर नंतर तेलगूत. मला तेलगू भाषा येत नसल्‍यामुळे हे संवाद इंग्रजी लिपीत लिहून नंतर वाचले.

- ध्रुव शिंक्रे, सिनेकलाकार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com