Verna Hit and Run Accident Case: हिट अँड रन प्रकरणात पादचाऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दुचाकीस्वारास वेर्णा पोलिसांनी अटक केली आहे. 15 जुलै रोजी हा अपघात झाला होता. तेव्हा संशयित दुचाकीवरून वेगाने जात असताना त्याचे वाहनावर नियंत्रण राहिले नाही आणि त्याने पादचाऱ्याला ठोकरले होते. यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता.
पोलिस निरीक्षक मेल्सन कोलॅको आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या संशयिताला शोधून काढले. सोनूकुमार बिपिन राम (वय 31 वर्षे) असे त्याचे नाव आहे. तो मडगाव येथील रहिवाशी आहे.
मूळचे झारखंडचा असलेला पण सध्या जुने म्हार्दोळ, महालसा मंदिराजवळ वेर्णा येथील राहत असलेले पवनकुमार मुख्तियार सिंग (वय 30) हे 15 जुलै रोजी रात्री 9 वाजून 16 मिनिटांनी जुन्या मार्दोळ रस्त्यावरून वेर्णा चर्चच्या दिशेने जात होते.
तेव्हा दुचाकीवरून वेगाने आलेल्या सोनूकुमार राम याने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत पवनकुमार गंभीर जखमी झाले होते. तर सोनूकुमार घटनास्थळावरून घाबरून पळून गेला होता. त्याने जखमीवर उपचारासाठी काहीही केले नाहीत, तसेच पोलिसांनाही अपघाताबाबत कळवळे नव्हते.
या अपघातात जखमी झालेल्या पवनकुमार यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह जतन करून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात हेड कॉन्स्टेबल श्याम भिकाजी गवस यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.