Kadamba Strike: ...तर कदंब कर्मचारी संपावर जाणार! कामगार संघटनेचा इशारा

Kadamba Bus: ३४ महिन्यांची थकीत रक्कम ६ सप्टेंबरपूर्वी अदा करा अशी मागणी
Kadamba Bus: ३४ महिन्यांची थकीत रक्कम ६ सप्टेंबरपूर्वी अदा करा अशी मागणी
Kadamba Transport Corporation Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वैयक्तिक स्वार्थ साधणाऱ्यांकडून कदंब महामंडळ संपवण्याचा डाव आखला जात आहे, तो डाव यशस्वी होऊ नये, म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु कदंब महामंडळाच्या कामगारांच्या प्रमुख सहा मागण्या मान्य न केल्यास ६ सप्टेंबर २०२४ पासून मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर कर्मचारी जातील, असा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. या संपाची नोटीस महामंडळाच्या प्रशासनास दिली असल्याची माहिती आयटकचे कॉ. ख्रिस्तोफर फ्रान्सिस्को यांनी दिली.

आयटकच्या कार्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी कॉ. राजू मंगेशकर, प्रसन्न उटगीर, सुहास नाईक, कदंब चालक आणि संलग्नित कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत नाईक चोडणकर, महेश ठाकूर, मनीष तांडेल, संजय आमोणकर, राजाराम राऊळ, उल्हास नाईक, रवींद्र नाईक व वृंदन सावळ आदींची उपस्थिती होती.

फ्रान्सिस्को म्हणाले, राज्यातील सर्वात मोठे महामंडळ आहे ते कदंब परिवहन. तीन हजारांवर कर्मचारी या महामंडळात असून, त्यांपैकी अडीच हजारापर्यंत कर्मचारी कायमस्वरूपी आहेत. कदंब महामंडळ हळहळू संपविण्याचा डाव सरकारातील काही वैयक्तिक स्वार्थ साधणाऱ्यांनी योजली आहे.

माझी बस योजना सुरू झाली, ५७ बसेस सुरू झाल्या आहेत. यामुळे कामगारांपासून हे महामंडळ दूर जाईल, अशी भीती आहे. कदंब महामंडळाचे आर्थिक बळ संपविण्याचाही प्रयत्न झाला आहे. २५० बसेस मोडीत काढल्या आहेत, हा कोटा भरून काढण्यासाठी अजून बसेस आणल्या नाहीत.

३०० डिझेल बसेस आणण्यासाठी आम्ही महामंडळाकडे विनंती केली होती. आंतरराज्य मार्गावर बसेस चालल्या पाहिजेत. नव्या ईव्ही बसेसवर कदंबचे कर्मचारी नेमावेत, अशी मागणीही संघटनेचे असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले, मुख्यमंत्री दिल्लीला जातात. त्यांनी आता ही बसेस आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत. कदंब महामंडळाच्या दोन मागण्या आहेत.

Kadamba Bus: ३४ महिन्यांची थकीत रक्कम ६ सप्टेंबरपूर्वी अदा करा अशी मागणी
Kadamba Bus: बस उशिरा का सोडली? ‘कदंब’कडून उद्धट उत्तरे

५० टक्के रक्कम द्या

गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे, त्यामुळे चतुर्थीपूर्वी ३४ महिन्यांची थकीत रक्कम मिळाली पाहिजे. कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० टक्के तरी ही थकीत रक्कम द्यावी, त्याचबरोबर जे सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना पूर्ण थकीत रक्कम अदा करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. तत्पूर्वी सकाळी बसस्थानक परिसरात कामगारांचा मेळावा घेण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com