Goa Shigmotsav 2023: फोंडा परिसरात जल्लोष; घुमला ओस्सय, ओस्सयचा नाद !

शासकीय पातळीवरील शिगमोत्सवास प्रारंंभ ः चित्ररथ, वेशभूषा स्पर्धकांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी
Goa Shigmotsav 2023
Goa Shigmotsav 2023 Dainik Gomantak

ओस्सयच्या तालावर आणि ‘घणचे कटर घण’च्या नादात आज (बुधवारी) फोंड्यातील अंत्रुज शिमगोत्सव समितीचा राज्य सरकारच्या पर्यटन खात्याच्या सहकार्याने शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. दर्शकांच्या मोठ्या उपस्थितीत आणि सहभागी स्पर्धकांच्या अमाप उत्साहात हा शिमगोत्सव झाला. या शिगमोत्सवाचे उद्‍घाटन कृषीमंत्री रवी नाईक तसेच कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी सावर्डेचे आमदार तथा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, शिमगोत्सव समितीचे पदाधिकारी, नगरसेवक, पंचसदस्य, जिल्हा पंचायत सदस्य आणि शिगमोप्रेमींची मोठी उपस्थिती होती.

कृषीमंत्री रवी नाईक यांनी शिगमोत्सवामुळे परंपरा जतन होण्याबरोबरच कला संस्कृतीला चालना मिळत असून युवा कलाकारांना प्रोत्साहनासाठी हा लोकोत्सव उपयुक्त ठरत असल्याचे नमूद केले. मंत्री गोविंद गावडे यांनीही शिमगोत्सव हा गोमंतकीयांचा आवडता सण असून शिगमोत्सवातून कला आणि संस्कृतीबरोबरच युवा कलाकारांनाही प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले. स्वागत रितेश नाईक यांनी केले. मनोहर भिंगी यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर श्रीफळ वाढवून व महादेव देवाला नमन करून शिमगोत्सवाला प्रारंभ झाला.

Goa Shigmotsav 2023
Vishwajit Rane: ग्रामीण जनतेने आधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा

20 चित्ररथ, 9 रोमटामेळ पथके सहभागी

गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे मर्यादित स्वरुपात असलेल्या शिमगोत्सवाला यंदा उधाण आले होते. रस्त्याच्या दुतर्फा शिमगोप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या शिमगोत्सवात यंदा 20 चित्ररथ, 9 रोमटामेळ, 5 लोककला पथके तसेच वेशभूषा स्पर्धेत कनिष्ठ गटात 46 तर वरिष्ठ गटात 17 स्पर्धकांनी भाग घेऊन शिमगोत्सवातील स्पर्धा यशस्वी केल्या. फोंडा पोलिस स्थानकाचे उपअधीक्षक आशिष शिरोडकर, निरीक्षक विजयकुमार चोडणकर, कृष्णा सिनारी आदीनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com