Harmal News : जुनसवाडा उद्यानात सुविधांची वानवा; विद्यार्थ्यांसह पालकवर्ग नाराज

Harmal News : ज्यावेळी उद्यानाची निर्मिती झाली, त्यावेळी क्रीडा साहित्य होते, त्यात वाढ करण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्या साहित्याची ‘वाट’ लागली, परंतु नवीन साधने सोडा, पूर्वीची खेळाची साधने नव्याने बसवण्याची पाळी खात्यावर आल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.
Harmal
Harmal Dainik Gomantak

Harmal News :

हरमल, मांद्रे पंचायत क्षेत्रातील जुनसवाडा प्रभागात असलेले वन उद्यान सुविधांच्या प्रतिक्षेत असून यंदाच्या सुटीत खेळ साहित्याची वानवा असल्यामुळे यंदाच्या सुटीत लहान मुलांसाठी निराशा झाली.

Harmal
Flights To Goa: छत्रपती संभाजीनगर ते गोवा थेट विमानसेवेची घोषणा, जूनपासून आठवड्याला तीन फ्लाईट्स

उद्यानात खराब साहित्य असून सौंदर्यीकरणाकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

जुनसवाडा येथील खडकाळ जमिनीत सुयोग्य पद्धतीने करून उद्यानात बनवले होते. तत्कालीन माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या प्रयत्नातून हे उद्यान तयार करण्यात आले होते. त्यानंतर झाडे, रंगबिरंगी फुलझाडे व आकर्षक झाडांची कापणी करून छान नियोजन वन खात्याने केले होते.

त्यावेळी अधिकाऱ्यांनी मुलासाठी खेळाचे साहित्य, बसण्यासाठी बाकडे व छोटेसे कॉफी हाउस उभारण्यात येईल, असे सांगितले होते. पण सद्यःस्थितीत बाकडे वगळता काहीही नसल्याचे दिसून येते, अशी माहिती पालक विश्वंभर मांद्रेकर यांनी दिली.

ज्यावेळी उद्यानाची निर्मिती झाली, त्यावेळी क्रीडा साहित्य होते, त्यात वाढ करण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्या साहित्याची ‘वाट’ लागली, परंतु नवीन साधने सोडा, पूर्वीची खेळाची साधने नव्याने बसवण्याची पाळी खात्यावर आल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. वन अधिकाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असेही पेडणेकर यांनी स्पष्ट केले.

जुनसवाडा वन उद्यानाचा ताबा वन खात्याकडे असून उद्यानाची एकदम वाईट अवस्था असल्याची जाणीव आहे. वन खात्याने त्याचा ताबा पंचायतीकडे दिल्यास, सर्वंकष विकासासाठी पंचायत स्तरावरून प्रयत्न केले जातील, असे सरपंच प्रशांत नाईक यांनी सांगितले.

आमदारांनी लक्ष द्यावे :

स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी प्राथमिक विद्यालये व इतर विकासाला चालना दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मुलांसाठी उद्यानाचा प्रश्‍न निकाली काढावा. उद्यानात मुलांसाठी साहित्य उपलब्ध करावे. आमदारांनी लक्ष द्यावे, जुनसवाडातील ग्रामस्थांची मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com