Goa Weather: हवामान बदलाचे परिणाम संपुर्ण जगावर होत असताना त्याला गोवा तरी कसा अपवाद राहणार? गोव्याचे तापमानही गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणत बदलत चालले आहे. या वर्षीचा जानेवारी हा महिना आत्तापर्यंतचा सर्वात थंड महिना ठरला होता तर त्यानंतरचे फेब्रुवारी आणि मार्च हे महिने या दशकातील सर्वात उष्ण महिने ठरले आहेत. गोवा वेधशाळेच्या हवाल्याने काही इंग्रजी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
दरम्यान, अद्याप उन्हाळा संपलेला नाही. एप्रिल महिना अद्याप संपायचा आहे आणि मे महिना अद्याप बाकी आहे. त्यामुळे आगामी काळात फेब्रुवारी आणि मार्च हे सर्वात उष्ण महिने राहतील की नाही, हे सांगता येत नाही.
मार्च 2022 मध्ये भारतीय हवामान विभागानुसार (IMD) पणजीमध्ये 34.2 अंश सेल्सियस सरासरी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी पणजीतील तापमानाचा पारा 34.6 अंश सेल्सियसपर्यंत गेला. मार्च 2023 हा पणजीसाठी सर्वात उष्ण मार्च महिना ठरला आहे. या महिन्यात सरासरी कमाल तापमान 34.6 अंश सेल्सियस आहे. हे दुसरे सर्वोच्च तापमान आहे.
यापुर्वी मार्च 2013 मध्ये 34.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. सन 2013 चा मार्च महिना वेधशाळेने 41 वर्षांतील सर्वात उष्ण महिना जाहीर केला होता. फेब्रुवारी आणि मार्चमधील वाढलेले तापमान हे कदातिच भविष्यात उष्णतेच्या लाटा येण्याचे संकेत आहेत, असेही शास्त्रज्ञांना वाटत आहे.
या वर्षीचा मार्चमध्ये पहिल्या पंधरवड्यात सुमारे 10 दिवस तापमान 36 अंश सेल्सियसहून अधिक होते. परंतु मार्च 2023 च्या उत्तरार्धात समुद्रावरून वेळेवर वारे वाहू लागल्याने तापमानातून काहीसा दिलासा मिळाला आणि तापमान सामान्य पातळीवर आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.