Policy Fraud: माहिती देणे विमा कंपन्‍यांचे कामच!

Policy Fraud: राज्‍य ग्राहक तक्रार आयोग : विम्‍याची पूर्ण रक्‍कम 6 टक्‍के व्‍याजाने फेडण्‍याचा आदेश
Policy Fraud:
Policy Fraud:Dainik Gomantak
Published on
Updated on

Policy Fraud:

सुशांत कुंकळयेकर

किचकट आणि सामान्‍यांसाठी अनाकलनीय अशा अटींचा फायदा घेऊन विमा कंपन्‍या ग्राहकांना अडचणीत आणण्‍याचाच प्रयत्‍न करत असतात. खरे तर ज्‍या अटी आणि शर्थी आहेत त्‍याची परिपूर्ण माहिती ग्राहकांना देणे ही विमा कंपन्‍यांची जबाबदारी असते. मात्र कंपन्‍या या अटींचा वापर जबाबदारी झटकण्‍यासाठीच करतात आणि असे प्रकार दुर्दैवी आहेत,

असे निरीक्षण नोंदवून गोवा राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयाेगाने विमा कंपनीला ग्राहकाच्‍या विम्‍याची पूर्ण रक्‍कम 6 टक्‍के व्‍याजाने फेडण्‍याबरोबरच त्‍याला झाल्‍या मनस्‍तापाबद्दल 25 हजारांची भरपाई तसेच दाव्याचा खर्च 15 हजार रुपये देण्‍याचा आदेश दिला.

आयोगाच्‍या प्रभारी अध्‍यक्ष वर्षा बाळे आणि सदस्‍य रचना गोन्‍साल्‍विस या द्विसदस्‍यीय आयोगाने हा आदेश दिला असून ग्राहकाची विम्‍याची दोन लाखांची रक्‍कम 6 टक्‍के व्‍याजाने फेडण्‍याचा आदेश दिला.

या प्रकरणाची पार्श्‍वभूमी अशी की, कुडणे-साखळी येथील हौशीदास मायणीकर याने आपली मुलगी जान्हवी मायणीकर हिच्‍या नावे दोन लाखांचा विमा उतरविला होता. दरमहा पगारातून 964 रुपयांचा हप्‍ता कापण्‍यात यावा, असे पत्रही त्‍यांनी दिले होते.

Policy Fraud:
Goa Government: सुदृढ, कुशल गोव्यासाठी सरकार कटिबद्ध; मुख्यमंत्री सावंत

28 मे 2017 पासून ही पॉलिसी सुरू झाली होती. त्‍यांच्‍या मुलीचे ११ फेब्रुवारी २०२० रोजी कॅन्‍सरने दुर्दैवी निधन झाले. त्‍यानंतर त्‍यांनी विमा रकमेसाठी विमा कंपनीकडे दावा केला. मात्र, कुठल्‍याही पॉलिसीचे कमीत कमी तीन वर्षांपर्यंत हप्‍ते भरले नाहीत, तर ती पॉलिसी लॅप्‍स होते, अशी सबब देऊन त्‍यांचा दावा फेटाळण्‍यात आला.

विमा कंपनीच्‍या या निर्णयाला मायणीकर यांनी उत्तर गोवा ग्राहक तक्रार आयोगाकडे आव्‍हान दिले असता, जुलै २०१७ ते ऑक्‍टोबर २०१७ पर्यंतचे चार हप्‍ते ग्राहकाने विमा कंपनीला भरलेच नाहीत, असा दावा करून विम्‍याची रक्‍कम वेळोेवेळी भरणे हे ग्राहकाचे कर्तव्‍य असते, असा दावा करून ग्राहकाने रक्‍कम वेळेवर न भरल्‍याने त्‍यांची पॉलिसी लॅप्‍स झाल्‍याचे सांगण्‍यात आले होते.

जिल्‍हा आयोगाने विमा कंपनीचे म्‍हणणे उचलून धरून मायणीकर यांचा दावा फेटाळला, त्‍यामुळे त्‍यांनी या निर्णयाला राज्‍य आयोगाकडे दाद मागितली होती. हा आव्‍हान अर्ज सुनावणीस आलेला असता ग्राहकाने चार महिन्‍यांचे हप्‍ते भरायचे बाकी राहिले आहेत.

Policy Fraud:
Water Problem: रगाडा नदीच्या पाण्याचे नमुने पुन्हा तपासणीला

त्‍यामुळे त्‍यांची पॉलिसी लॅप्‍स झाली आहे. हे जोपर्यंत ग्राहकाने आपल्‍या विम्‍याची रक्‍कम मागेपर्यंत त्‍यांना कळविण्‍यात आले नव्‍हते. हा मुद्दा पुढे आला. मात्र, असे असतानाही विमा कंपनीने त्‍या ग्राहकाकडून राहिलेले हप्‍ते वसूल केले.

पॉलिसी लॅप्स झाली, तर हप्ते कसे कापले?

पॉलिसी लॅप्‍स झाली होती, तर त्‍याची माहिती ग्राहकाला का दिली गेली नाही आणि पॉलिसी लॅप्‍स असताना पुढचे हप्‍ते विमा कंपनीने कसे कापले, असा मुद्दा आयोगाने उपस्‍थित करुन जर पॉलिसी लॅप्‍स झाली हाेती. तर त्‍याची माहिती ग्राहकाला देणे विमा कंपनीला बंधनकारक होते. आपल्‍या किचकट नियमांचा फायदा घेऊन विमा कंपनी या आपल्‍या जबाबदारीपासून दूर जाऊ शकत नाही, असे नमूद करीत जिल्‍हा आयोगाचा निर्णय रद्दबातल करीत विम्‍याची पूर्ण रक्‍कम फेडण्‍याचा आदेश दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com