

पर्यटनप्रेमींसाठी आयआरसीटीसीने एक आकर्षक टूर पॅकेज जाहीर केले आहे. गोव्याच्या सहलीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हे पॅकेज अत्यंत परवडणारे आणि सोयीचे आहे. जगभरातील पर्यटकांचे आवडते स्थळ असलेल्या गोव्याच्या सहलीचा आनंद पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम आणि सुरक्षित पद्धतीने घेण्यासाठी आयआरसीटीसीने “गो गोवा” असं विशेष टूर पॅकेज जाहीर केलं आहे.
गोव्याचे नयनरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक चर्च, पोर्तुगीज वास्तुकला आणि स्वादिष्ट सी-फूडचा आस्वाद या पॅकेजमधून आरामात घेता येणार आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरच्या शांत वातावरणात काही काळ घालवू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
हे टूर पॅकेज ३ रात्री आणि ४ दिवसांचे असून यात प्रवाशांच्या सर्व सोयी-सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. या पॅकेजची विशेष बाब म्हणजे ते चंदीगडहून गोव्यापर्यंतच्या विमानसेवेसह उपलब्ध आहे. प्रवाशांना गोव्यात पोहोचताच त्यांच्या स्थानिक भ्रमंतीसाठी कॅबची सुविधा दिली जाणार आहे.
निवासासाठी सुटसुटीत आणि आरामदायी हॉटेलची सोय असून जेवण आणि विमा देखील या पॅकेजमध्येच समाविष्ट आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वतंत्रपणे काहीही नियोजन करण्याची गरज उरत नाही. संपूर्ण सहल ही पूर्णपणे संगठित आणि नियोजित पद्धतीने पार पडते.
या सहलीची प्रस्थान तारीख १० डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. गोवा भेटीसाठी हा काळ अत्यंत आनंददायी मानला जातो कारण या हंगामात हवामान सुखद आणि समुद्रकिनारे अधिक आकर्षक दिसतात. सहलीदरम्यान प्रवाशांना गोव्याच्या उत्तर आणि दक्षिण भागातील महत्त्वाची पर्यटनस्थळे दाखवली जाणार आहेत. बीचवरचा सूर्यास्त, वॉटर स्पोर्ट्सचे रोमांचक अनुभव आणि स्थानिक संस्कृतीचा जवळून परिचय, या पॅकेजमुळे शक्य होणार आहे.
या टूर पॅकेजचा कोड NCA03 असा आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार पॅकेजची किंमत निश्चित करण्यात आली आहे. एकट्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तीसाठी या सहलीची किंमत ₹३७,७५० इतकी आहे. दोन लोकांसोबत प्रवास केल्यास प्रति व्यक्ती ₹३१,५७०, तर तीन जणांसोबत प्रवास केल्यास प्रति व्यक्ती ₹३१,२६० खर्च येणार आहे. त्यामुळे कुटुंब आणि मित्रांसोबत प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना अधिक फायदेशीर ठरू शकते.
परवडणारी किंमत, विमान प्रवासाची सोय, आरामदायी निवास, स्वादिष्ट जेवण आणि व्यवस्थित आखलेली पर्यटन सफर यामुळे “गो गोवा” टूर पॅकेज पर्यटकांसाठी मोठा लाभ ठरणार आहे. त्यामुळे या हिवाळ्यात सुट्टीचा आनंद किनाऱ्यांवर घ्यायचा असेल, तर आयआरसीटीसीचे हे पॅकेज नक्कीच एक उत्तम पर्याय ठरू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.