International Yoga Day 2023 : मानसिक संतुलन गरजेचे युवकांनी योगाभ्‍यास करून समृद्ध देश घडवावा : फडते

निरामय जीवन व मानसिक संतुलनासाठी योगाभ्यास हा महत्त्वाचा आहे.
International Yoga Day 2023
International Yoga Day 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

International Yoga Day 2023 : योगाला आज आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जा मिळाला आहे. गोव्यात योगाचा प्रचार आणि प्रसार होत आहे. युवकांनी योगाभ्यासात मोठ्या संख्‍येने सहभागी झाले तर पुढील पिढी सुदृढ आणि सक्षम होईल, असे फोंड्यातील एक ज्येष्ठ योगशिक्षक नागेश फडते यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

फोंडा तालुक्यातील दुर्भाट या गावचे पण सध्या तळावली येथे स्थायिक झालेले हिंदी शिक्षक पण नंतरच्या काळात योगासंबंधीची महती जाणून घेतल्यानंतर पूर्णवेळ योगवर्गात झोकून देऊन इतरांनाही योगाचे महत्त्व पटवून देताना स्वतः वर्ग सुरू केले, असे नागेश फडते.

त्‍यांनी आडपई श्रीदत्त मंदिर, कासवाडा गणेश मंदिर, वाडी-तळावली येथील बालकल्याण आश्रम अशा विविध ठिकाणी योगवर्ग चालवले. योग म्हणजे आपल्या देशाची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

International Yoga Day 2023
Goa Monsoon Update: ऐन आषाढात पाऊस रेंगाळला; शेतकऱ्यांच्या नजरा नभाला! पेरणी खोळंबली

आयुष्याची पंचाहत्तरी गाठली असल्याने सध्या वयोमानाप्रमाणे फडते यांनी योगवर्ग बंद केले असले तरी घरातच प्राणायम व इतर योगासंबंधी आसने ते करतात. अजूनही निरामय जीवन जगणारे फडते सांगतात, मानसिक संतुलनासाठी योगाभ्यास हा महत्त्वाचा आहे.

International Yoga Day 2023
G20 Summit Goa 2023 : भारतात अव्वल पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता

उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी योगाभ्यास शिकण्यासाठी प्रेरणा दिली आणि त्यातूनच आपण योगाकडे आकर्षित झालो. स्वामी रामदेव बाबांच्या वाराणशी येथील आश्रम संकुलात फोंड्याचे योगशिक्षक दिनेश नाईक तसेच इतरांबरोबर योगाचे प्रशिक्षण घेतले. सहाच दिवसांतच योगाभ्यासाच्या ज्ञानाचे भांडार आमच्यासमोर उभे राहिले.

नागेश फडते, योगशिक्षक (तळावली)

International Yoga Day 2023
Reliance Most Valuable Company: रिलायन्सने रचला नवा इतिहास, खाजगी क्षेत्रातील बनली सर्वात मौल्यवान कंपनी

योगाभ्यासातून माणसाला निरोगी आयुष्य तर मिळतेच पण मानसिक शांती प्रस्थापित करण्याबरोबरच दुर्धर रोग दूर सारण्याची शक्तीही मिळते. त्यामुळेच युवा पिढीने योगाभ्यास करायला हवा. योगाभ्यासातील प्राणायाम, अनुलोमविलोम व इतर आसने नियमित केली तर आरोग्याच्या विविध समस्या दूर होऊ शकतात आणि एक समृद्ध भारत घडू शकतो.

प्रकाश नाईक (योगशिक्षक, वाडी-तळावली, फोंडा)

International Yoga Day 2023
International Yoga Day 2023: माहिती नसलेले योगाचे 'हे' फायदे वाचा एका क्लिकवर

नियमित योगामुळे आत्मविश्‍वास अधिक बळकट झाला आहे. सुरूवातीला योग म्हणजे वेळ घालवण्याचा प्रकार असे वाटायचे. पण योगामुळे आत्मिक बळ तर वाढतेच, शिवाय शरीरही तंदुरुस्त राहते. प्राणायम हा योगाचा महत्त्वाचा प्रकार आहे. वयोवृद्धांनीही प्राणायम केले तरी ते त्‍यांच्‍या शरीरासाठी पूरक ठरू शकते.

विराज शिवा गावकर (योग विद्यार्थी, फोंडा)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com