Yoga Day 2024
Yoga Day 2024 Dainik Gomantak

Yoga Day 2024 : चांगल्या कर्माचे फळ चांगलेच : पद्मा मोळ्यो

Yoga Day 2024 Margao : जीवनविद्या मिशन मठग्रामतर्फे सदगुरु वामनराव पै यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्ताने योगदिनाचे आयोजन शांतीनगर रावणफोंड येथील पंचायत सभागृहात करण्यात आले होते.
Published on

Margao News :

मडगाव, निर्गुण निराकार परमेश्वर शरीर रूपाने सगुण साकार झाला आहे. माणसाने चांगला विचार केला, चांगली कर्मे केली, चांगलेच फळ मिळते, ही सदगुरु वामनराव पै यांची शिकवण आहे, असे उद्‍गार डॉ. पद्मा मोळयो यांनी काढले.

जीवनविद्या मिशन मठग्रामतर्फे सदगुरु वामनराव पै यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्ताने योगदिनाचे आयोजन शांतीनगर रावणफोंड येथील पंचायत सभागृहात करण्यात आले होते. यावेळी डॉ. पद्मा मोळयो प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

यावेळी नावेली हेल्थ सेंटर च्या अधिकारी डॉ. सुषमा देसाई, मठग्राम केंद्राचे अध्यक्ष वल्लभ दुभाषी , डॉ. पद्मा मोळयो, गणपती मंगेशकर, सुनेत्रा केणी , रवींद्र नेवगी, यांची उपस्थिती होती.

Yoga Day 2024
Goa Top News: पेडण्यात संरक्षक भिंत कोसळली, पावसाची अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

डॉ. सुषमा देसाई यांनी सांगितले की, नेहमी ताजे अन्न आपल्या आहारात असावे. फ्रीज मधील अन्न खाणे टाळावे.

यावेळी योगागुरु विंदा काकोडकर यांनी प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी आदी प्रकार शिकवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com