Indore Double Murder: वडील, बहिणीची हत्या करुन आरोपी गोव्यात लपला; पोलिसांचे 'सर्च ऑपरेशन' सुरु

लग्न ठरत नसल्याने रागाच्या भरात वडील आणि बहिणीची हत्या केल्याची घटना संयोगितागंज, इंदूर येथून समोर आली होती.
Indore Double Murder Case
Indore Double Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Indore Double Murder: लग्न ठरत नसल्याने रागाच्या भरात वडील आणि बहिणीची हत्या केल्याची घटना संयोगितागंज, इंदूर येथून समोर आली होती. हत्येनंतर संशयित आरोपी मुलगा गोव्यात लपून बसल्याचे तपासात समोर आले होते.

दरम्यान, संशयिताचा शोध घेण्यासाठी संयोगितागंज पोलिसांचे पथक गोव्यात दाखल झाले असून, पोलिसांनी गोवा गुन्हे शाखेचाही तपासात समावेश केला आहे. गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने रेस्टॉरंट, समुद्रकिनारे आणि हॉटेल्समध्ये शोध सुरू केला आहे.

नौलाखा भागातील वसुधैव कुटुंबकम अपार्टमेंटमध्ये सेवानिवृत्त बँक मॅनेजर आणि त्यांच्या मुलीची हत्या झाल्याची माहिती संयोगितागंज पोलिसांना 8 नोव्हेंबर रोजी मिळाली.

एसबीआयमधून निवृत्त झालेले कमल किशोर धामांडे (76) आणि त्यांची मुलगी रमा अरोरा (53) यांचे मृतदेह बंद फ्लॅटमध्ये आढळून आले. मृताचा मुलगा पुलकित याने या हत्या केल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. तेव्हापासून तो बेपत्ता आहे.

दरम्यान, संशयित पुलिन हा गोव्यात (पणजी) राहत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाली होती. निवडणुका आणि दिवाळीमुळे पोलीस पथकाला निघण्यास उशीर झाला. तीन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांचे पथक गोव्यात दाखल झाले आहे.

पुलिन यांचे वडील केके धामांडे यांच्या एसबीआय बँकेचे तीन एटीएम आहेत. पळून जाताच त्याने अग्रवाल नगर (सपना संगीता) येथील एटीएममधून पैसे काढले. त्यानंतर त्यांनी बडोदा (गुजरात) गाठून एटीएममधून पैसे काढले.

बँकेकडून माहिती घेऊन पोलिसांनी बडोदा गाठले मात्र, पुलिन फरार झाला. पुलिनने शेवटचा 13 नोव्हेंबर रोजी गोव्यात एटीएमचा वापर केला होता. पुलिनकडे केके धामांडे यांचे सिमकार्डही आहे. त्यामुळे हा संदेश पोलिसांपर्यंत उशिरा पोहोचतो. पोलिसांनी बँकेकडून माहिती घेतली तोपर्यंत पुलिन फरार झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com