Goa GMC: गोमेकॉत हिमोफिलिया उपचार केंद्राचे उद्‌घाटन

विश्वजित राणे: रुग्णांसाठी लवकरच आधुनिक यंत्रणा उभारणार
GMC Goa
GMC GoaDainik Gomantak

पणजी: काहीसा दुर्मिळ असणाऱ्या, पण अलीकडे वाढत जाणाऱ्या हिमोफिलिया रुग्णांवर उपचार करता यावे यासाठी स्वतंत्र उपचार केंद्राची सुरवात करण्यात येत आहे. यासाठीच्या आधुनिक उपचारासाठी आम्ही मुंबईच्या केईएम रुग्णालयाबरोबर सामंजस्य करार करणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

(Inauguration of GMC Hemophilia Treatment Centre)

GMC Goa
Goa Politics: आधी लोकसंपर्क वाढवा, मंत्रिपद देणे नंतर बघू: सी. टी. रवी

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आज हिमोफिलिया फिजिओथेरपी केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. अनार खांडेकर उपस्थित होते.

मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, त्यासंबंधीच्या अत्याधुनिक उपचारासाठी आम्ही मुंबईच्या केईएमबरोबर सामंजस्य करार करणार आहोत. याबाबतची प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच हा करार अस्तित्वात येईल. त्यामुळे राज्यातील रुग्णांना आधुनिक उपचार मिळतील. यावेळी डॉ. बांदेकर आणि डॉ. खांडेपारकर यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com