Bicholim Road : चारपदरी बगलमार्गाचे आज डिचोलीत उद्‍घाटन

Bicholim Road : यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष कुंदन फळारी, राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता आत्माराम गावडे यांची उपस्थिती असणार आहे.
Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim Road :

डिचोलीतील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चारपदरी बगलमार्गाचे लोकार्पण अखेर उद्या (गुरुवारी) निश्चित करण्यात आले आहे. उद्या सकाळी १०.३० वा. होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या बगलमार्गाचे उद्‍घाटन होणार आहे.

यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष कुंदन फळारी, राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता आत्माराम गावडे यांची उपस्थिती असणार आहे. या बगलमार्गाच्या लोकार्पणाचा सोहळा उद्या (गुरुवारी) निश्चित करण्यात आला होता.

मात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होवून केंद्रात सरकार सत्तेवर येईपर्यंत लोकार्पण सोहळा स्थगित करण्यात आला होता. मात्र आता पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार बगलमार्गाचे लोकार्पण होणार आहे. अशी माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली. राज्य महामार्ग-१ अंतर्गत येणारा व्हाळशी-डिचोली ते वाठादेवपर्यंतचा ४.२ किलोमीटर अंतराचा चारपदरी बगलमार्ग पूर्ण झाला आहे. ७४ हून अधिक खर्चाचा हा प्रकल्प लोकार्पणासाठी सज्ज करण्यात आला आहे.

Bicholim
Goa Loksabha Election Result: अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये नाईकांच्या साथीला; डिचोलीत भाजपची ‘किमया’

बगलमार्ग सोयीस्कर ठरणार...

साखळी ते अस्नोडा या मुख्य रस्त्याला जोडून हा बगलमार्ग येत आहे. व्हाळशी आणि वाठादेव याठिकाणी मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या जंक्शनवर विभाजक आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाची दिशा दर्शविणारा मोठा फलकही जंक्शनवर उभारण्यात आला आहे.

त्यामुळे डिचोलीमार्गे थेट विमानतळावर जाणाऱ्या वाहनांना हा बगलमार्ग सोयीस्कर ठरणार आहे. काही का असेना, या बगलमार्गामुळे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ जाणाऱ्यांना हा फलक दिशादर्शक ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com