Vasco News : वास्कोत रॅलीद्वारे ‘बॉटल फॉर चेंज’ उपक्रमाचे उद्‍घाटन; कचरा मुक्त शहर मोहीम

Vasco News : विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा जागृती रॅलीत सहभाग
Vasco
Vasco Dainik Gomantak

Vasco News :

वास्को, जागतिक महासागर दिनानिमित्त, पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी ‘कचरामुक्त शहर’ मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रॅलीला हिरवा बावटा दाखवला आणि बिस्लेरी ट्रस्टने आयोजित बिस्लेरीच्या ‘बॉटल फॉर चेंज’ उपक्रमाचे उद्‍घाटन केले.

शालेय विद्यार्थ्यांनीही समुद्र संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेविका शमी साळकर, श्रध्दा महाले, दामू कासकर, दामोदर नाईक, तसेच शालेय विद्यार्थी व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिक्वेरा यांनी वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांच्या वास्कोमधील कचरा व्यवस्थापन सुव्यवस्थित करण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि महासागर संरक्षणाच्या महत्त्वावर जोर दिला.

Vasco
Shripad Naik: गोव्याला केंद्रीय राज्यमंत्री पद! श्रीपाद नाईक यांनी घेतली शपथ

ते म्हणाले, की माणूस म्हणून आपण अनेकदा महासागराच्या आणि निसर्गाच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतो. आपल्या अस्तित्वासाठी महासागर महत्त्वाचा आहे, लाखो लोक त्यांच्या उपजीविकेसाठी त्यावर अवलंबून आहेत. आपल्या अन्न पुरवठ्यापैकी अंदाजे ३५% पुरवठा महासागरातून होतो. म्हणून, आपल्या महासागरांचे संरक्षण आणि जतन करणे हे आपले कर्तव्य आहे.

महासागर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आपल्या गरजा पूर्ण करतो. सर्व कचरा, विशेषतः प्लास्टिक काढून टाकून आणि किनाऱ्यावर कचरा टाकणे थांबवून आपण तो स्वच्छ ठेवणे अत्यावश्यक आहे.

- दिप्तेश प्रियोळकर,

मुरगाव पालिकेचे मुख्य अधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com