Valpoi News : केळावडेत जपली जाते वर्षानुवर्षे चालत आलेल्या ‘पाणयाची पराब’ परंपरा

निसर्गाप्रति कृतज्ञता : पहिल्या पावसानंतर झरे, विहिरींच्या पाण्याची केली जाते पूजा
पाणयाची पराब
पाणयाची पराबDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई : सत्तरी तालुक्यात वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथा, परंपरा आजही त्याच तन्मयतेने जपल्या जातात. केळावडे गावात पहिल्याच पावसानंतर झरे, विहिरी यांतील पाण्याची विधिवत पूजा केली जाते. निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या परंपरेला ''नवीन पाणयाची पराब'' असे म्हणतात. यंदा नव्या पाण्याची पूजा नुकतीच येथे करण्यात आली.

केळावडे गावातील श्री सातेरी केळबाय देवस्थानचे पूजारी प्रल्हाद गावस यांनी सांगितले की, पाणयाची पराब म्हणजे, पावसाळा सुरू झाल्यावर गावातील नैसर्गिक झरे किंवा विहिरीला आलेल्या पहिल्या वहिल्या पाण्याची भक्तिभावाने पूजा करायची आणि तेच पाणी वापरून तांदळाचा उपार (उपहार) बनवायचा आणि देवाला नैवेद्य दाखवून नंतर तो संपूर्ण गावाला वाटायचा. या पहिल्या पाण्याने देवाला अभ्यंग स्नान घातले जाते. हा उपार म्हणजेच देवाचा प्रसाद म्हणून मोठ्या श्रध्देने भक्तिभावाने गावकरी मंडळी ग्रहण करतात. आद्रा नक्षत्राच्या पहिल्या चरणावेळी ही परंपरा पार पाडली जाते.

पाणयाची पराब
Valpoi News : अडवईत नैसर्गिक पद्धतीने भाजी लागवड; सयाजी देसाई यांची स्वयंरोजगाराकडे वाटचाल

करमलाच्या पानांचे महत्त्व

तांदळापासून प्रसाद बनवला जातो. या प्रसादासाठी करमलाची पाने वापरली जातात. ही परंपरा आजही जपली जात आहे. हा तांदळाचा प्रसाद करमलाच्या पानावरच दिला जातो. कारण पूर्वीचे लोक शेतीत काम करताना माळे घालण्यासाठी, जेवणावेळीसाठी याच पानांचा वापर करीत असत. म्हणून आजही प्रसादासाठी करमलाच्या पानालाच प्राधान्य दिले जाते, असे गावस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com