
पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज पावसाने चांगली हजेरी लावली. आज दिवसभर राज्यात सर्व ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पावसाची बरसात झाली. त्यामुळे गोवा वेधशाळेने राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तविला होता तो खरा ठरला. (IMD Goa predict heavy rain for next four days)
गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 39.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत राज्यात एकूण 2498 मि. मी. म्हणजेच 98.35 इंच पाऊस झाला आहे. पुढील दोन दिवस असाच सुरू राहिल्यास पाऊस इंचाची शंभरी गाठेल.
राज्यात 14 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच देशातील काही राज्यांत उद्या मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता भारतीय वेधशाळेने वर्तविली आहे. त्यात ओडिसा, पश्चिम बंगाल, तेलंगण, आंध्रप्रदेश आणि दक्षिण छत्तीसगडचा समावेश आहे.
मच्छीमारांना इशारा
दक्षिण महाराष्ट्र तसेच गोवा तटीय 75 कि. मी.च्या क्षेत्रात 40 ते 50 कि. मी. प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात प्रवेश न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामूळे मच्छीमारांना आता सतर्क रहात सुरक्षित परतण्याचा विचार करावा लागणार आहे. कारण ही स्थिती येत्या चार दिवस जैसे थे असणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.