सावधान! गोव्यात मुलींची तस्‍करी वाढतेय

कोरोनामुळे अलीकडचे काही महिने सोडले तरी गोव्‍यात (Goa) देशी-विदेशी पर्यटकांची (Tourist) संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे
Human Trafficking is on the rise in Goa
Human Trafficking is on the rise in Goa Flickr

पणजी : कोरोनामुळे अलीकडचे काही महिने सोडले तरी गोव्‍यात (Goa) देशी-विदेशी पर्यटकांची (Tourist) संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी वेश्‍‍याव्‍यवसाय (Prostitution) व मुलींची तस्‍करीही वाढली आहे. याबाबत ‘अर्ज‘ (अन्‍यायरहित जिंदगी) या संस्‍थेचे व्‍यवस्‍थापक अरुण पांडे यांच्‍याशी संपर्क साधला असता त्‍यांनी सांगितले की, पर्यटक येथे येतात ते ‘जिवाचा गोवा’ करण्‍यासाठी. परिणामी वेश्‍‍याव्‍यवसाय फोफावला आहे.

किनारी भागात (Costal zone) याचे प्रमाण जास्‍त असले तरी हळूहळू तो शहरांबरोबरच ग्रामीण भागातही (Rular Area) पोचला आहे. वेर्णा, वास्‍को, फोंडा, डिचोली, पर्वरी येथे अशा अनेक प्रकरणांचा पर्दाफाश (Exposed) झालेला आहे. पूर्वी वेश्‍‍याव्‍यवसाय हॉटेलमध्‍येच चालायचा. आता हॉटेल्‍स पोलिसांच्‍या रडारवर आल्‍याने एजंट फ्‍लॅट किंवा घर भाड्याने घेऊन तेथे हा व्‍यवसाय चालवतात. कदाचित तो आपल्‍या घराच्‍या आसपासही सुरू असू शकतो.

Human Trafficking is on the rise in Goa
Goa Rape Case: मी सुद्धा 14 वर्षांच्या मुलीचा बाप आहे

दुसरी गोष्‍ट म्‍हणजे या व्‍यवसायात ग्राहक मिळविताना खूप मोठी खबरदारी घेतली जाते. सर्व बाजूंनी चौकशी करून विश्‍‍वास पटल्‍यावरच सौदा पक्का केला जातो. या व्‍यवहारातील एजंट एका दिवशी एका मुलीमागे ४० ते ५० हजार रुपये कमावतो. अशा अनेक मुली असतात. म्‍हणजे एजंटची (Agent) एका दिवसाची कमाई लाखो रुपयांच्‍या घरात असते.

मुलीच्‍या हातात मात्र केवळ दोन ते तीन हजार रुपये ठेवून बोळवण केली जाते. आता तर ऑनलाईनच सगळे व्‍यवहार चालतात. त्‍यामुळे पोलिसांच्‍या सायबर सेलसमोर मोठे आव्‍हान आहे. या तस्‍करीविरोधात आमची राज्‍यभर जागृती सुरू आहे. आतापर्यंत आम्‍ही सुमारे ४०० मुलींची या व्‍यवसायातून सुटका केलेली आहे. त्‍यातील ७ टक्के मुली या गोव्यातील आहेत, असे पांडे यांनी स्‍पष्‍ट केले. वाढती मानवी तस्‍करी ही गोव्‍यासाठीही मोठी समस्‍या आणि डोकेदुखी ठरत चालली आहे.

Human Trafficking is on the rise in Goa
Goa Assembly Session: कोळसा ब्लॉक प्रकरणीचा प्रश्न पुढे ढकलला; अधिवेशन तहकूब

गोवा हे जागतिक पर्यटनस्‍थळ असल्‍यामुळे येथे या समस्‍येने शिखर गाठले आहे. देशातील तब्‍बल २३ राज्‍यांतून मुली आणून गोव्‍यात वेश्‍‍याव्‍यवसायात ढकलल्‍या जातात. त्‍यात शेजारच्‍या महाराष्‍ट्रातून मोठ्या प्रमाणात मुली आणल्‍या जातात. शिवाय बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, म्‍यानमार, रशिया येथूनही मुलींची तस्‍करी केली जातेय. कमी प्रमाणात का असेना, स्‍थानिक मुलीही या दलदलीत रुतत चालल्‍या आहेत. ही कीड वेळीच ठेचली नाही तर भविष्‍यात ती आपल्‍या घरापर्यंतही पोहोचू शकते. याबाबत संबंधित क्षेत्रातील मान्‍यवरांशी संपर्क साधला असता त्‍यांनी त्‍यास दुजोराच दिला.

Human Trafficking is on the rise in Goa
Tarun Tejpal Case: लैंगिक अत्याचार प्रकरणावरील सुनावणी तहकूब

अरुण पांडे, संस्‍थापक (‘अर्ज’, अन्‍यायरहित जिंदगी) यांच्या म्हणण्यानुसार, "गोव्‍यात मुलींची तस्‍करी होतेय ही बाब आता लपून राहिलेली नाही. महाराष्‍ट्र, प. बंगाल आणि दिल्ली या राज्‍यानंतर गोव्‍यात मोठ्या संख्‍येने मुली आणल्‍या जातात. आमच्‍या ‘अर्ज’ संस्‍थेने आतापर्यंत सुमारे ४०० मुलींची वेश्‍‍याव्‍यवसायातून सुटका केलेली आहे. पण याविरोधात आवाज उठवायचा असेल तर समाजात एकजूट पाहिजे. अशा गैरव्‍यवस्‍थेविरोधात दबाव निर्माण केला पाहिजे. तो जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत अशा अनैतिक गोष्‍टींना रान मोकळेच असेल."


सबिना मार्टिन्‍स, संयोजक (बायलांचो साद) यांच्या मते, "पर्यटनाला प्रोत्‍साहन देत असताना दुसऱ्या बाजूने दारू, जुगार याबरोबरच अप्रत्यक्षरीत्या वेश्‍‍याव्‍यवसायही फोफावत चालला आहे. मागे एकदा एका मुलीला पाटो-पणजी येथील कार्यालयाचा पत्ता देऊन नोकरीच्‍या उद्देशाने वेश्‍‍याव्‍यवसायात ढकलण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. लागलीच तिने आमच्‍याशी संपर्क साधला. आम्‍ही त्‍या फोनवर पुन्‍हा संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला असता तो लागला नाही. मुलींनी सावध राहिले पाहिजे. तसेच जोपर्यंत पोलिस यंत्रणेत भ्रष्‍टाचार आहे, तोपर्यंत अशा लोकांवर कारवाई अशक्‍य आहे."

विद्या गावडे, अध्‍यक्षा (गोवा महिला आयोग) , म्हणाल्या, "मानवी तस्‍करी रोखण्‍यासाठी कायद्यात बदल केला पाहिजे. तसेच राज्‍याच्‍या सीमेवर कडक तपासणी होणे गरजेचे आहे. कारण महाराष्‍ट्रातून गोव्‍यात तस्‍करी मोठ्या प्रमाणात होत आहे. आम्‍ही तीन सदस्‍यीय समिती स्‍थापन केली असून, लवकरच मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहोत. या समस्‍येवर काय तोडगा काढता येईल, या उद्देशाने पुढील दोन महिन्‍यांत विविध उपाययोजना करण्‍यात येतील. कारण आमच्‍या पोरीबाळींचे भविष्‍य महत्त्‍वाचे आहे."

हेल्‍पलाईन
मुलींची तस्‍करी व वेश्‍‍याव्‍यवसाय रोखण्‍यासाठी : traffickingresourcecenter.org किंवा १-८८८-३७३७-८८८ येथे संपर्क साधता येईल. ही हेल्‍पलाईन २४ तास खुली असते.

‘अर्ज’ आणि ‘इकॅप्‍ट’ (लक्‍झमबर्ग) यांनी‍ संयुक्तरित्‍या सर्वेक्षण करून २०१४ ते २०१९ या कालावधीचा एक अहवाल बनवला आहे. त्‍यानुसार गोव्‍यातील प्रकरणे आकडेवारीत खालीलप्रमाणे :

- ४०० मुली आणि महिलांची सुटका. ३५३ जणींनी मान्‍य केली की आपण या व्‍यवसायासाठी बळी पडलो आहोत.
- ३५३ पैकी २९८ भारतीय तर ५५ विदेशी मुली.
- शेजारच्‍या महाराष्‍ट्र राज्‍यातून व बांगलादेशातून सर्वांत जास्‍त तस्‍करी.
- ऑफलाईन ६४ टक्के तर ऑनलाईन ३६ टक्के तस्‍करी.
- हॉटेल/लॉजमध्‍ये ७७.७ टक्के, मसाज पार्लरमध्‍ये १२.४ टक्के तर फ्‍लॅट/बंगल्‍यात ९.८ टक्के व्‍यवसाय.
- वेश्‍‍याव्‍यवसायात ढकलण्‍याचे प्रमाण : मित्रांकडून ३४.५ टक्के, ओळखीच्‍या माणसांकडून २२.१ टक्के तर अनोळखी व्‍यक्तींकडून २३.३ टक्के. त्‍यात पालक आणि जोडीदाराचे प्रमाण अत्‍यल्‍प म्‍हणजे जवळपास ६ टक्के आहे.
- पोलिसांकडून सुटका झालेली प्रकरणे : क्राईम ब्रँच ३३.६ टक्के, कळंगुट पोलिस २१.८ टक्के, हणजूण पोलिस १२.४ टक्के, पणजी पोलिस ९.५ टक्के.
- सुटका करण्‍यात आलेल्‍या मुलींचे वय : २५ ते ३५ वयोगटातील ४३.२२ टक्के, २१ ते २५ वयोगटातील ३५.८७ टक्के, १८ ते २१ वयोगटातील १२.९९ टक्के.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com