Bicholim News : कारापूर नदी किनारी मोठी धूप; बेकायदा रेती उत्खनन

Bicholim News : परिसरातील शेती-बागायती येणार संकटात
River
River Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News : डिचोली, मांडवी नदीचा फाटा असलेल्या कारापूर नदीत बेकायदेशीरपणे रेती उत्खनन करण्याचे प्रकार वाढले आहेत. या नदीत ''कोळशे कातर'' परिसरात रात्रीच्यावेळी चोरून रेती उपसा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या या रेती उत्खननामुळे कारापूर नदीकाठचा धूप झाला असून, नदीकाठावरील शेती-बागायती संकटात आली आहे. अशी माहिती काही स्थानिक बागायतदारांनी देऊन, हा बेकायदा व्यवसाय त्वरित बंद करुन आमच्या शेती-बागायती वाचवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून कारापूर नदीत बेकायदेशीरपणे रेती काढण्यात येत आहे. मात्र आता या प्रकारात वाढ झाली आहे. अशी माहिती मिळाली आहे.

रेती उत्खनन करण्यास कायद्याने बंदी आहे. तरीदेखील डिचोली तालुक्यातील विविध भागात बेकायदेशीरपणे हा व्यवसाय चालूच आहे. खाण खाते आणि भरारी पथकाने गेल्या दोन वर्षात विविध ठिकाणी छापा टाकून केलेल्या कारवाईमुळे तसे स्पष्टही झालेले आहे. बेकायदा रेती उत्खनन व्यवसायाची पाळेमुळे आता कारापूर भागातही पोचली आहेत.

कारापूर नदीत कोळशे कातर परिसरात तर रात्रीच्यावेळी काही होड्या येत असून, रेती उत्खनन करीत आहेत, अशी माहिती नदीकाठी शेती आणि नारळाच्या बागायती असलेल्या काही स्थानिक बागायतदारांनी दिली. रेती काढणाऱ्यांना विचारले, तर त्यांच्याकडून दमदाटीची भाषा करण्यात येत आहे, अशी या बागायतदारांची तक्रार आहे.

River
Goa Crime News: अनुराग राजवतची दोन तास चौकशी

बांधांना भगदाड!

कोळशे कातर परिसरात मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन करण्यात येत असल्याने नदीच्या धडा कोसळत आहेत. नदीकाठच्या बांधांना भगदाड (खावटे) पडले आहेत. नदीचे पाणी शेती बागायतीनी घुसत असून, शेतजमीन आणि माडांची हानी होत आहे.

हा प्रकार जर चालूच राहिला, तर शेती बागायती संकटात येणार आहेत. अशी भीती बागायतदार व्यक्त करीत आहेत.

प्रशासन निद्रीस्त

एकाबाजूने सरकार शेती-बागायती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. मात्र दुसऱ्या बाजूने बेकायदेशीर गोष्टींमुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे. कोळशे कातर परिसरातील बेकायदा रेती उत्खनन बंद करावे.

त्यासाठी संबंधीत प्रशासकीय यंत्रणांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. तरीदेखील सर्रासपणे रेती उत्खनन चालू आहेत, असे एक बागायतदार डॉ. नवसो सावंत यांनी सांगून, कारापूर नदीतील बेकायदा रेती व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com