Goa Farm बागायती शेती संकटात! ‘बैलपार’ पुराची भीती कायम

प्रवाह वाढला : बंधाऱ्यावरील ओंडके त्वरित काढा
Bailpar river
Bailpar riverdainikgomantak

मोरजी: बैलपार नदीला रविवारी पुन्हा एकदा पूर आल्याने मोठ्या प्रमाणात शेती बागायती पाण्याखाली गेली. पूर असाच राहिला तर शेजारील लोक वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. नदीच्या बंधाऱ्यावर लाकडाची ओंडके अडकले होते. ते ओंडके काढावेत, अशी मागणी सरकारकडे वारंवार करण्यात आली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात या पाण्याचा प्रवाह दुसऱ्या बाजूने वळलेला आहे. त्यामुळे सरकारने आतातरी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते तथा वकील जितेंद्र गावकर, शेतकरी उदय महाले आदींनी केली आहे.

(Horticulture crisis in Goa, fear of 'Bailpar' flood continues)

Bailpar river
Vishwajit Rane बेरोजगारीची समस्‍या दूर करण्‍यासाठी प्रयत्‍न करणार;विश्‍‍वजीत राणे

यासंदर्भात, शेतकरी उदय महाले म्हणाले, पंपहाऊसमुळे शेती बगायतींची कशी नुकसानी होते, यासंदर्भात लेखी निवेदने दिली गेली आहेत. या ठिकाणी जो बंधारा आहे तो बंधारा ही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने त्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात लाकडे अडकलेली आहे. ती काढावी अशी मागणी केली असतानाही ती सरकारने काढली नाहीत आता या परिसरात लोकवस्तीमध्ये पाणी घुसण्याची भीती आहे.

काँग्रेसचे नेते तथा वकील गावकर म्हणाले, की जलसिंचन खात्याने जो पंपहाऊस प्रकल्प उभारलेला आहे. त्यासाठी सरकारकडे कोणीही या ठिकाणी पंप हाऊस बांधावा, अशी मागणी केली नव्हती. तरीही सरकारने या ठिकाणी पंप हाऊस उभारलेला आहे. या पंपहाऊस मुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह बदलून सध्या शेती बागायतीत शिरलेला आहे. जर या पाण्याचा प्रवाह असाच राहिला तर पाणी वाहून लोकवस्तीत घुसण्याची भीती आहे.

पंपहाऊससाठी अट्टहास का?

बैलपार नदीवर पंप हाऊस बसवावा, अशी कुणीच मागणी केली नव्हती. मात्र पेडणे तालुक्यात होऊ घातलेल्या प्रकल्पांना पाणी पुरवविण्यासाठी जलसिंचन खात्यांतर्गत स्थानिकांना विश्वासात न घेता आणि पंचायतीलाही विश्वासात न घेता पंपहाउस उभारले. ते उभारण्यापूर्वी जो नदी बंधारा छोटेखानी बंधारा होता तो बंधारा मोडून त्या ठिकाणी नवीन चांगल्या पद्धतीचा बंधारा बांधावा, अशी मागणी गेल्या दोन वर्षापासून शेतकरी करत होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अगोदर बंधारा बांधण्यापूर्वी पंपहाऊसचे बांधकाम केले, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Bailpar river
Goa Accident : कुंकळ्ळीत मासळीवाहू ट्रक पुलावरुन खाली कोसळला

पुलाची संरक्षक भिंतही कोसळलेली

बैलपार नदीकिनारी जलसिंचन खात्याअंतर्गत २७ कोटी रुपये खर्च करून पंपहाऊस बसवण्यात आले आहे. पंपहाऊसमुळे पाण्याचा प्रवाह अडकला गेला. परिणामी या नदीकिनारी असलेल्या पुलाची संरक्षक भिंतही कोसळलेली आहे. जोड रस्त्याला धोका संभवत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अधिकाअधिक बांधकाम पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. सरकारने यावर त्वरित उपाय योजना करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी उदय महाले यांनी केली आहे.

तिळारी विसर्ग; घरांना धोका

चार पाच वर्षापासून सतत कासारवरर्णे बैलपार रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जात आहे. कधीकधी तिळारीचे पाणी सोडले जात असल्याने या बैलपार नदी परिसरातील घरांनाही धोका संभवत असतो. पूर्णपणे रस्ते पाण्याखाली गेल्याने चांदेल हाळी किंवा कासारवर्णे नागझर या भागात येण्या-जाण्यासाठी पाय वाटही राहत नाही. रहदारी या रस्त्यावरून बंद असल्याने जनसंपर्क तुटलेला असतो. यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये, सरकारने उपाय योजना करायला हवी, असे स्थानिक सांगतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com