वाघेरीतील फुलपाखरांचे माहेरघर होणार सुरक्षित

वनमंत्र्यांच्या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींकडून स्वागत: जंगल पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील बनवणार
Butterfly
ButterflyDainik gomantak
Published on
Updated on

पणजी: वाघेरीचे जंगल हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर  करणार, असे गोव्याचे वन मंत्री विश्वजीत राणे यांनी जाहीर केल्याने या निर्णयाचे पर्यावरण प्रेमींकडून स्वागत केले जात आहे. वाघेरी डोंगर हे फुलपाखरांचे माहेरघर आहे. त्यामुळे हे क्षेत्र फुलपाखरांसाठी सुरक्षित अधिवास बनणार आहे.

वाघेरीचे जंगल हे जैविक संपदेचे आगर आहे. या जंगलात पट्टेरी वाघांच्या वावरासह नानाविध वृक्षसंपदा आणि वन्यजीव यांचा नैसर्गिक अधिवास आहे. वाघेरी जंगलाचा काही भाग म्हादई अभयारण्य क्षेत्रात येतो, तर केरी बाजूचा भाग हा खासगी वन क्षेत्रात येतो. वाघेरीचा संपूर्ण भाग पर्यावरण संवेदनशील झाला तर त्याचा फायदा इथल्या जीवसृष्टीला होईल.

Butterfly
फोंड्यात सर्वधर्मीयांचा ‘भाईचारा’

माणसांचा वावर फुलपाखरांच्या जीवावर

वाघेरीवरील माऊली देवराईच्या परिसरात म्हावळिंगीचे पाणी, मोरकुच्याचे पाणी या ठिकाणी ही फुलपाखरे आढळतात. वाघेरीवरील विविध कारणास्तव मनुष्याची वाढती वर्दळ या फुलपाखरांचा नैसर्गिक अधिवास नष्ट करीत आहे. जर वाघेरीचे जंगल पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील झाले तर या भागात निसर्ग पर्यटनाचे प्रकल्प येण्यापासून प्रतिबंध होईल आणि आपोआपच येथील माणसांचा वावर कमी होईल. फायदा या फुलपाखरांना होईल.

वाघेरीवरच आढळला पट्टेरी वाघ

वाघेरी डोंगर हे पट्टेरी वाघांचे नैसर्गिक अधिवास आहे. एप्रिल २०१३ मध्ये म्हादई अभयारण्य क्षेत्राचे तत्कालीन वनाधिकारी परेश पोरोब यांनी वाघेरी परिसरातच वाघाची छायाचित्रे सर्वप्रथम कॅमेरा ट्रॅपद्वारे मिळवली होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्राणी शास्त्रज्ञ डॉ. उल्हास कारंथ यांच्या संस्थेने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाची छायाचित्रे टिपली होती.

Butterfly
आगोंदमध्ये बिबट्यांचा वाढला वावर

...तर वाघालाही संरक्षण

अंजुणे जलाशयाच्या ठिकाणी आणि वाघेरीवरील नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी पट्टेरी वाघांच्या पावलांचे ठसे यापूर्वी आढळले आहेत. वन्यजीव संस्था, डेहराडूनचे माजी डीन ए.जे.टी. जॉन सिंग यांनी म्हादईत पट्टेरी वाघांचा अधिवास असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाघेरीचे जंगल पर्यावरण संवेदनशील होणे ही आनंदाची बाब असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com