पब्लीसिटी स्टंट: ‘गोवा लव्हज् केजरीवाल’

‘अजीब है गोवा के लोग’ हे वाक्य अनेकांनी ऐकवले.
गोवाछ अरविंद केजरीवाल
गोवाछ अरविंद केजरीवालDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘गोवा लव्हज् केजरीवाल’ (Arvind Kejriwal) असे होर्डिंग्ज झळकले असले, तरी खरोखर गोमंतकीयांची भावना तशी आहे असे स्पष्टपणे कोणीही सांगितले नाही. अनेकांनी याची ‘पब्लीसिटी स्टंट’ अशा शब्दांत संभावना केली. निवडणुकीनंतर (Election) याचे उत्तर मिळेल असे सांगण्यासही अनेकांनी कमी केले नाही. (Hoardings like Goa Loves Kejriwal were displayed in Goa)

या वादात आपल्याला पडायचे नाही असेच अनेकांचे म्हणणे होते. निवडणूक जवळ आल्यावर अशी होर्डिग्ज लागणे अपेक्षितच आहे. त्याला इतर पक्ष प्रत्युत्तर देतील. आम्हाला सर्वसामान्य गोमंतकीय म्हणून यात फारसा रस नाही. ज्यावेळी निवडणूक येईल, तेव्हा आमचे मत आम्ही व्यक्त करू. अशी होर्डिंग्ज लावून मते मिळत असतील, तर प्रचारच करावा लागणार नाही अशी कोपरखळीही काहींनी मारली. त्यांनी नावानिशी आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

गोवाछ अरविंद केजरीवाल
Goa Election: 'AAP' राजकारण तापवणार

असे असले तरी ‘अजीब है गोवा के लोग’ हे वाक्यही अनेकांनी ऐकवले. आम्ही आमच्या मनाला वाटते तेच करणार. 21 आमदारांचे स्पष्ट बहुमत असलेल्या आणि केंद्रात सत्ता असलेल्या भाजपला आम्हीच गोमंतकीय मतदारांनी 13 वर आणून ठेवले होते याची आठवणही काहींनी करून दिली. गोवा म्हणजे दिल्ली नव्हे असेही काहींनी तारस्वरात सांगितले.

गोवाछ अरविंद केजरीवाल
Goa: आपने हातघाईचे राजकारण केल्यास जशास तसे उत्तर देऊ : भाजपचा इशारा

गोव्याचे केजरीवालांवर प्रेम आहे असे त्यांनी स्वतःहून म्हणणे किंवा त्यांच्या जाहिरातबाजीची जबाबदारी असणाऱ्याने म्हणण्यात काहीच वावगे नाही. मात्र, गोमंतकीय खरोखर प्रेम करतात याचे उत्तर निवडणुकीनंतरच मिळणार आहे. निवडणूक वर्ष असल्याने असे प्रकार अपेक्षितच आहेत.

- ॲड. अमित पालेकर, सामाजिक कार्यकर्ते

केजरीवाल यांच्या पक्षाला दिल्लीनंतर आता गोव्यात जम बसवायचा आहे. दिल्लीत त्यांनी होर्डिंग्जवरच बराच पैसा खर्च केला आहे. आता गोव्यातही ते चित्र दिसेल.

- अमेय बेतकेकर,शिक्षक

आता नव नव्या नेत्यांचा उदय होत जाईल तशा नव्या प्रकारच्या जाहिरातीही दिसू लागतील. जनतेच्या नजरेत आपली छबी निर्माण करण्याचा प्रयत्न यापलीकडे याचे महत्त्व नाही.

- अजित तळावलीकर, माजी अधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com