Goa History: गावड्यांच्या शुद्धीकरणाचे सत्य आणि आदिम सांस्कृतिक जीवनशैली

Goa Gaude History: आजच्या या आधुनिक युगात गावड्यांसारख्या कष्ट करणार्या समाजाला महत्त्व राहिलेले नाही. जेव्हा महत्त्व होते तेव्हा इथल्या उच्चभ्रू समाजाने आम्हाला पिढ्यान्पिढ्या बैलासारखे राब राब राबवले आणि जसा बैल म्हातारा झाल्यावर त्याची रवानगी खाटिकाकडे केली जाते तशीच गत या गोमंतकात गावड्यांची केली.
Goa Gaude History: आजच्या या आधुनिक युगात गावड्यांसारख्या कष्ट करणार्या समाजाला महत्त्व राहिलेले नाही. जेव्हा महत्त्व होते तेव्हा इथल्या उच्चभ्रू समाजाने आम्हाला पिढ्यान्पिढ्या बैलासारखे राब राब राबवले आणि जसा बैल म्हातारा झाल्यावर त्याची रवानगी खाटिकाकडे केली जाते तशीच गत या गोमंतकात गावड्यांची केली.
Goa HistoryCanva
Published on
Updated on

ख्रिश्चन मिशनर्यांनी विविध उपाय करून इथल्या लोकांचे धर्मांतर केले. गावडा आदिवासी जमातीसाठी नवहिंदू म्हणून नवीन जात, धर्म जन्माला घातला, हेसुद्धा एक प्रकारे धर्मांतरणच नाही काय? गावडे हे ब्राह्मण, क्षत्रिय ,वैश्य, शूद्र या हिंदूधर्म व्यवस्थेच्या कुठल्या गटात समाविष्ट होत नसताना आणि गावडे ही जमात आहे हे माहीत असून मसुराश्रमाने आपल्या हिंदुत्वाच्या बळकटीसाठी नवहिंदू गावडे ही नवीन जात जन्माला घातली. ही कृती पोर्तुगिजांच्या धर्मांतराशी समांतर नाही काय?

गावडा हा ब्राह्मणांइतकाच श्रेष्ठ आहे. गावडा पूर्वी मांसभक्षण करीत नव्हता. कुठल्याही व्यसनांच्या अधीन तो झालेला नव्हता. या गोमंतभूमीत गावड्यांमध्ये ‘जल्मी’ ही बिरुदावली लावणारा गावडा, ब्राह्मणांइतकाच श्रेष्ठ आहे असे आम्ही मानतो. गोमंतकात बाराजण म्हणजेच बारा ‘बुदवंत’ किंवा दहाजण म्हणजे दहा ‘बुदवंत’ ही न्यायदानाची पद्धत गावड्यांमध्ये विकसित झालेली होती आणि ‘भौसा’च्या सहकार्याने हे ‘बुदवंत’ लोक आपल्या गावडा समाजामध्ये आपल्या समूहाचा न्याय स्वतःच करायचे.

आजच्या या आधुनिक युगात गावड्यांसारख्या कष्ट करणार्या समाजाला महत्त्व राहिलेले नाही. जेव्हा महत्त्व होते तेव्हा इथल्या उच्चभ्रू समाजाने आम्हाला पिढ्यान्पिढ्या बैलासारखे राब राब राबवले आणि जसा बैल म्हातारा झाल्यावर त्याची रवानगी खाटिकाकडे केली जाते तशीच गत या गोमंतकात गावड्यांची केली. इथल्या राज्यकर्त्यांना गावड्यांचे महत्त्व त्यांच्या एक गटापुरते, मतापुरतेच वाटते.

दुसरी बाजू राहिली ती इथल्या उच्चभ्रू समाजाने आमच्या पूर्वजांच्या जमिनीवर, शेतीवर, कुळागरावर आपला मालकी हक्क दाखवून त्याने आम्हांला अक्षरश: लुबाडून आमच्या संसाराच्या कोर्ट कचेरीच्या पायर्या चढायला लावून आमच्या संसाराच्या पार चिंध्या केल्या आणि वैतागून हा समाज व्यसनाच्या अधीन झाला.

गावड्यांचे शुद्धीकरण करून घेण्यासच पोर्तुगिजांचा सक्त विरोध होता. तेवढ्यात एक अशी घटना घडली हे दिनांक ११ मार्च १९२८ रोजी केरी फोंडा गावात गावडे यांचे शुद्धीकरण होणार असल्याचे जाहीर झाले व त्या संदर्भात डॉटर दादा वैद्य यांना केरी फोंडा येथे अटक करून पणजीच्या मध्यवर्ती पोलीस चौकीवर कैद करून ठेवले. त्यांना सोडण्याची चिन्हे दिसेना. त्यावेळी सुमारे १,००० गावड्यांनी पणजीत मोर्चा काढला व तो काबोच्या राजवाड्यावर नेला. शुद्धीकरणाच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सोडण्यात यावे अशी मागणी गावड्यांनी पोर्तुगीज सरकारपाशी केली.

गोव्याचे मूळ पुरुष गावडे त्यादिवशी प्रथमच पोर्तुगीज सरकारला आव्हान द्यायला राजवाड्यापर्यंत आले होते. गोव्याच्या संपूर्ण इतिहासात आदिवासी समूहाकडून असे पहिल्यांदाच घडत होते. पोर्तुगीज राजवट गडबडली आणि गावड्यांच्या मागण्यानुसार त्यांनी डॉटर दादा वैद्यांना तात्काळ मुक्त केले. या घटनेचा दृष्टांत या लेखात देण्याचे कारण एवढेच की आपल्या विघटित झालेल्या संपूर्ण गावडा जमातीने आपल्या पूर्वजांनी दाखवलेल्या या पराक्रमाचा बोध घ्यावा. आपले पूर्वज भित्रे नव्हते आणि आपणदेखील आज भित्रे नाही हा संदेश आदिवासी समाजाने एकमेकांना दिला पाहिजे. आपण भित्रे नाही वेळ आली तर आपण दुसर्यासाठी आपला जीव ओवाळून टाकू शकतो हे सिद्ध होत आहे.

डॉटर दादा वैद्य हे कुठल्याही गावडा जमातीच्या गटाचे नेते नव्हते, ना गावडा वंशाचे. परंतु त्यांची सुटका करण्याकरिता काष्टी नेसणार्या आणि कमरेला कोयता अडकवणार्या गावड्यांनी हजारोंच्या संख्येने पोर्तुगीज राज्यसत्तेला आव्हान दिले. गोवामुक्तीच्या वेळी ४५० वर्षाचा पोर्तुगीज राजवटीचा ध्वज खाली खेचणारे चिंबल गावचे स्वर्गीय तुकाराम सुभा शिरोडकर व स्वर्गीय दिना काणकोणकर या आदिवासींना कोण विचारतोय? हाच ध्वज खाली खेचणारे कोणी उच्चवर्णीय असते तर एव्हाना त्यांची स्मारके विधानसभेच्या प्रवेशश्ररासमोर आज उभी असती.

जो हिंदू धर्मसंकटात आहे त्याला वाचवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आदिवासींचे मतपरिवर्तन व त्यांचा इतिहास पुसून टाकण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या व संकल्पना घेऊन येतात. दिनांक १० डिसेंबर २००३ रोजी आदिवासींचा बुद्धी भ्रष्ट करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गोवा प्रदेश शाखेने आदिवासींसाठी युवा संमेलन आयोजित केले. इथले आदिवासी मूळ वसाहतकार रामायण, महाभारत आधीपासून या भारतात होते. हा इतिहास या संघटनांना मान्य नाही. हा गावड्यांच्या शुद्धीकरणानंतर ७५ वर्षांनी झालेला गोव्यातील आणखीन एक प्रयोग. गावडे आदिवासीच आहेत, ते गिरीवासी नाहीत किंवा वनवासी नाही. श्रीराम वनवासी होते परंतु त्यांना उष्टी बोरे देणारी शबरी ही आदिवासीच होती. कोणी उच्चवर्णीय गिरीवसी, वनवासी होऊ शकतो परंतु तो आदिवासी होऊ शकत नाही. कारण आदिवासींपाशी असणारी खालील वैशिष्ट्ये त्यांच्यापाशी नाहीत.

Goa Gaude History: आजच्या या आधुनिक युगात गावड्यांसारख्या कष्ट करणार्या समाजाला महत्त्व राहिलेले नाही. जेव्हा महत्त्व होते तेव्हा इथल्या उच्चभ्रू समाजाने आम्हाला पिढ्यान्पिढ्या बैलासारखे राब राब राबवले आणि जसा बैल म्हातारा झाल्यावर त्याची रवानगी खाटिकाकडे केली जाते तशीच गत या गोमंतकात गावड्यांची केली.
Goa Politics: गोव्यातील गावडे मुळात कोण?

आदिम सांस्कृतिक जीवनशैली

भौगोलिक अलिप्तता

स्वतंत्र संस्कृती

इतर जनसमूहांबरोबर मिसळण्यात वाटणारा लाजाळूपणा

सर्वांगीण मागासलेपण व दुर्बलता.

२९ फेब्रुवारी २००४ रोजी सुमारे ७६ वर्षांनी हिंदू धर्मरक्षा समितीला गावड्यांच्या शुद्धीकरणाची पुनश्च जागरण करण्याची आठवण झाली. २०२८मध्ये हेच धर्मरक्षक शुद्धीकरणाचा शताब्दी सोहळा साजरा करण्यासाठी पुन्हा हिंदू धर्माचा घंटानाद करायला येतील. परंतु गोवा मुक्तीपासून जे गावडे आपल्या घटनात्मक हक्कांपासून वंचित राहिले ते या धर्ममार्तंडांना दिसत नाही. शुद्धीकरणाच्या नावावर नवहिंदूंच्या जखमेवरची खपली काढून त्यांना पुन्हा भूतकाळात नेऊन इतिहासातील मढी उकरून काढण्याचा हा प्रकार केला जाईल.

१९२८च्या शुद्धीकरणातून गावड्यांचा नवहिंदू म्हणून काय विकास केला याचे उत्तर या धर्मरक्षकांनी द्यायला पाहिजे.

Goa Gaude History: आजच्या या आधुनिक युगात गावड्यांसारख्या कष्ट करणार्या समाजाला महत्त्व राहिलेले नाही. जेव्हा महत्त्व होते तेव्हा इथल्या उच्चभ्रू समाजाने आम्हाला पिढ्यान्पिढ्या बैलासारखे राब राब राबवले आणि जसा बैल म्हातारा झाल्यावर त्याची रवानगी खाटिकाकडे केली जाते तशीच गत या गोमंतकात गावड्यांची केली.
Goa History: पुरातन काळातील मुंडारींचा वारसा सांगणारी 'गावडा संस्कृती'

राजू नायक आपल्या लेखात नवहिंदू गावड्यांनी नवीन देवळे बांधल्याचे उल्लेख करतात; ती कुठली देवळे, त्याची सविस्तर माहिती दिली असती तर बरे झाले असते. आमच्या चिंबल गावात विनायक मसूरकरांनी तीन मूर्ती आणून शुद्धीकरणाच्या स्थानावर ठेवल्या आहेत. हे स्थान न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे येणार्या काळात या मूर्तींचे काय होईल ते त्यांनाच माहीत.

या शुद्धीकरणामुळे आदिवासी गावडे यांचे काय काय नुकसान झाले यासंबंधी लिहिण्यासाठी मला वेगळा लेख लिहावा लागेल. कदाचित त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जातील. खुद्द नवहिंदू गावडे यांच्यादेखील. कारण जसे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे जी व्यक्ती आपला इतिहास जाणत नाही त्यांना परयांचा इतिहास आपला वाटू लागतो आणि ते त्या इतिहासाचा गुलाम होतात.

राजू नायक यांनी एका संशोधनाच्या आधारे गावड्यांच्या शुद्धीकरणावर लेख लिहिला, त्या निमित्ताने मला या शुद्धीकरणामागचे सत्य काय, हे लिहावेसे वाटले. या लेखात मांडलेले मुद्दे अनेक संशोधकांनी विचारातच घेतलेले नाहीत हे वाचनातून माझ्या लक्षात आले आहे. आदिवासींच्या मनात असलेली घुसमट मी लेखातून मांडलेली आहे.

(लेखक ‘गाकुवेध’ संघटनेचे संस्थापक व प्रवक्ता आहेत.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com