Hello Goykar : ‘हॅलो गोंयकार’मध्ये आश्वासनांची खैरात; विरोधकांची टीका

प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार की हवेत विरणार
CM Pramod Sawant
CM Pramod Sawanttwitter
Published on
Updated on

महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी पणजी दूरदर्शनवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा होणारा ''हॅलो गोयंकार'' फोन-इन कार्यक्रम लोकप्रिय बनत आहे. शुक्रवारी 7 जुलैला झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जनतेने विचारलेल्या विविध प्रश्नांना सविस्तर उत्तर देत अनेक आश्वासनांची खैरात केली.

या कार्यक्रमात दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला आहेत. मात्र ही आश्वासने सत्यात कधी उतरणार ? की हवेत विरणार असा प्रश्न विरोधक विचारत आहेत.

दूरदर्शनवरील या कार्यक्रमात राज्यभरातून कल्याणकारी योजना, राज्यात वाढणारी गुन्हेगारी, मटका जुगार, स्मशानभूमीचे प्रश्न, भंगार अड्डे , बेरोजगारी, अशा विविध समस्यांबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी विविध सामाजिक सुरक्षा योजना अर्ज लवकरच निकालात काढण्यात येतील, असे सांगितले होते.

CM Pramod Sawant
Mahadayi Water Dispute : गोव्याचे महत्त्वपूर्ण पाऊल; कर्नाटकविरोधात याचिका दाखल

समाज माध्यमांवर चर्चा

‘हॅलो गोंयकार’ या कार्यक्रमाबाबत समाज माध्यमांवरही जोरदार चर्चा आहे. अनेक जणांनी मुख्यमंत्री सरळ सामान्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. त्यामुळे सरकारचा हा चांगला उपक्रम आहे, असे म्हटले आहे.

तर अनेकांनी ''सरकार आपल्या दारी, ऐवजी आता सरकार आपल्या टीव्हीतून अशी उपरोधाची टीकाही केली आहे. सरकारने आश्वासन जरूर द्यावेत, पण ती पाळावीत आणि त्यांची पूर्तता करावी, अशा प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या आहेत.

...अशी आश्‍वासने!

  • या कार्यक्रमात सरकारी खात्यातील जुनी वाहने दोन महिन्यात स्क्रॅप केली जातील.

  • सामाजिक योजना येत्या महिन्यात मार्गी लावणार

  • जुगार व मटक्यासारख्या अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्यात येईल

  • गोमेकॉमध्ये पदवीधर अभ्यासक्रमासाठी आरक्षणाची अधिसूचना काढण्यात येईल

  • सुधारित किमान वेतन १५ दिवसात जाहीर केले जाईल

  • गोमेकॉमध्ये नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने सुरू केले जाईल

  • सरकारी खात्यासाठी घेतलेल्या वाहनांचे पैसे महिन्याभरात दिले जातील

CM Pramod Sawant
Mainapi Waterfall : पंधरा वर्षांपूर्वी पतीचे निधन, मैनापीत कर्ता मुलगा बुडाल्याने आजारी आई एकाकी

हे सरकार शो, इव्हेंटचे आहे. केवळ टीव्ही शो, इनडोर स्टेडियम मध्ये इव्हेंट केले जात आहेत. दिलेल्या आश्वासनाबाबत मुख्यमंत्री गंभीर नाही. विधानसभेतीलही अनेक आश्वासने ते विसरत आहेत. त्यामुळे आता आश्वासन कमिटीकडे जावे लागेल अशी स्थिती आहे.

- विजय सरदेसाई, अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड.

सरकारने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनही पाळली नाहीत. तीन सिलेंडरचे काय झाले. महागाई भत्ता कुठे गेला. त्यामुळे अशा कार्यक्रमात दिलेल्या आश्वासनांकडे किती गांभीर्याने पाहायचे हे जनतेने ठरवले पाहिजे. जनताच याबाबत न्याय करेल अशी अपेक्षा आहे. सरकार मात्र गंभीर नाही हेच खरे.

- अमरनाथ पणजीकर, माध्यम विभाग प्रमुख काँग्रेस.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com