IMD Goa: भारतीय हवामान विभागाने मॉन्सूनचे आगमन कधी होणार हे नुकतेच सांगितले आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून जूनपासून सुटका होईल. पण सध्या तरी गोव्यात कडक उन्हापासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.
आगामी आठवड्यात राज्यात तापमान जास्तच राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारपर्यंत उष्ण आणि दमट स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. या काळात कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस राहणार असल्याचे म्हटले आहे.
(temperature rise in Goa)
मंगळवारी, राज्यात कोरडे हवामान होते, IMD ने राज्यात कमाल 36 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद केली होती. तथापि कमाल तापमानात वाढ होऊनही, IMD ने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला नाही.
महाराष्ट्रही होरपळणार
आयएमडीने ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशातील किनारी भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. IMD ने इशाऱ्यामध्ये म्हटले आहे की, बुधवारपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
मॉन्सून 4 जूनला केरळमध्ये
मॉन्सून उत्तरेकडे सरकल्यावर दिलासा मिळत असतो. नैऋत्य मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये धडकेल, असा अंदाज नुकतेच आयएमडीने वतर्वला होता. केरळमध्ये मॉन्सूनच्या सुरवातीची सामान्य तारीख 1 जून आणि गोव्यासाठी 5 जून आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.