Valpoi News : पित्याचे छत्र हरपले; मंत्र्यांनी केले कन्यादान

Valpoi News : सध्याच्या धावपळीच्या निवडणूक काळातही वेळात वेळ काढून त्यांनी तनुजा सावंत हिचे कन्यादान केल्याने राणे दाम्पत्याच्या या सामाजिक दायित्वाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

पद्माकर केळकर

Valpoi News :

वाळपई, पित्याचे छत्र हरपल्याने निराधार झालेल्या कोपार्डेतील सावंत कुटुंबीयांच्या मदतीला ऐनवेळी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉ. दिव्या राणे या धावून आल्या.

सध्याच्या धावपळीच्या निवडणूक काळातही वेळात वेळ काढून त्यांनी तनुजा सावंत हिचे कन्यादान केल्याने राणे दाम्पत्याच्या या सामाजिक दायित्वाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

रविवारी (ता. २८) आवाडे, साटेली-भेडशी येथील चामुंडा मंगल कार्यालयात कोपार्डे येथील कै. सुरेश सावंत यांची सुकन्या तनुजा हिचा विवाह घोटगेवाडी येथील कै. वसंत दळवी यांचे चिरंजीव महादेव यांच्याशी थाटात पार पडला. या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे मंत्री राणे यांनी स्वत:हून पुढाकार घेत लग्नसोहळ्याची सर्व जबाबदारी घेतली.

Valpoi
Goa News Update: शनिवारी मोदींची सभा, काँग्रेसची तक्रार, गुन्हे; गोव्यातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा

या सोहळ्याला दोन्ही पक्षांकडून सुमारे दोनशे लोक उपस्थित होते. राणे दाम्पत्याने शनिवारी हळदी समारंभ तसेच रविवारी विवाह संस्कार विधीसह कन्यादानाचे पवित्र कार्य केले.

यजमानपद स्वत: निभावले

कोपार्डेतील तनुजा हिला वडील नाहीत. वडिलांचे छत्र हरपल्याने तनुजा, तिची आई, भाऊ सगळेच एकाकी पडले होते. त्यातच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सावंत कुटुंबीयांनी विश्वजीत राणे यांना मदतीची हाक दिली होती. या हाकेला धावून येत केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर सर्व धार्मिक विधींचे यजमानपद स्वत:हून करू, असे आश्वासन राणे दाम्पत्याने सावंत कुटुंबीयांना दिले होते.

मोदींची सभा, तरीही कर्तव्य बजावले

शनिवारी (ता. २७) सांकवाळ येथे सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वपूर्ण सभा होती. तरीही विश्वजीत आणि डॉ. दिव्या राणे यांनी वेळेचे योग्य नियोजन करीत शनिवारी कोपार्डे येथे तनुजा हिचा हळदी समारंभ स्वत: यजमानपद स्वीकारून केला. राणे दाम्पत्याच्या या स्पृहणीय सामाजिक बांधिलकीचे सत्तरीत कौतुक होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com