बाणावली मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी येत्या रविवारी आयोजित केलेले आरोग्य तपासणी शिबिर अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
माजी आमदार चर्चिल आलेमाव आणि त्यांची कन्या वालांका यांनी शिबिराशी संबधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करुन हे शिबिर रद्द केल्याचा आरोप वॉरन यांनी केला आहे.
चर्चिल आणि वालांका यांनी मणिपाल रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. आरोग्य तपासणी अचानक रद्द झाल्याने बाणावलीमधील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच, मतदारसंघातील वॉरन यांची वाढती प्रसिद्धी आरोग्य तपासणी शिबिर रद्द करण्याचे कारण असू शकते असाही दावा स्थानिकांनी केला.
बाणावली मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी येत्या रविवारी (03 मार्च) आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. सुरावली येथे आयोजित या शिबिरात वजन, उंची, रक्तदाब, रक्तातील साखर, डोळे तपासणी, ब्रेस्ट स्क्रिनिंग, बोन डेन्सिटी यासह विविध तपासण्या केल्या जाणार आहेत.
सुरावली चर्च हॉल येथे रविवारी सकाळी 09 ते दुपारी 02 च्या दरम्यान या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वॉरन आलेमाव यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिली होती.
दरम्यान, सुरावली येथे आयोजित वॉरन आलेमाव यांचे पूर्व नियोजित आरोग्य तपासणी शिबिर अचानक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. चर्चिल आलेमाव आणि वालांका आलेमाव यांच्याकडून याबाबत कोणतेही वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.