चार ते पाच अज्ञातांनी लूटमारीच्या उद्येशाने मारहाण केली व दीड लाख रुपये लुटले. यात चारचाकी बोलेरो जळून खाक झाली.
अशी कहाणी पोलिसांना सांगणाऱ्या मूळ हरियाणाच्या वक्तीचे सत्य वेगळेच समोर आले आहे. मद्यधुंद अवस्थेत चारचाकीतून जात असताना अपघात झाला आणि जीप जळल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत म्हापसा शहराकडून हणजूणकडे बोलेरो जीपगाडी घेऊन निघालेला नीरज साऊरथ (सध्या रा. हडफडे व मूळ हरयाणा) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीपगाडी भरधाव वेगात रस्त्याच्या शेजारील संरक्षक भिंतीवर धडकली आणि जळून खाक झाली.
चालक नीरज गाडीची पुढील काच तोडून आपली कशीबशी सुटका करून घेतली आणि जीव वाचवला. ही घटना काल मध्यरात्री खुर्सावाडा-आसगाव येथे घडली.
दरम्यान, आसगाव येथे आपल्याला अडवून अज्ञातांनी हल्ला करून गाडीतील दीड लाख रुपयांची रक्कम लाटल्याचा बनाव करून चसलकाने खोटी तक्रार दाखल केली होती. परंतु तो बनाव होता हे पोलिस चौकशीत उघड झाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.