Harmal Garbage : हरमल वेशीवर कचराच; विद्रूपीकरण थांबवा

Harmal Garbage : गेले कित्येक दिवस हे प्रयत्न चालू असून गावच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे. ही जागा हरमल गावचे प्रवेशद्वार असून त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे, असे सरपंच इब्रामपुरकर यांनी म्हटले आहे.
harmal road garbage
harmal road garbage Dainik Gomantak

Harmal Garbage :

हरमल, येथील किनारी भागांत पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरमल व मांद्रे गावच्या वेशीवर काही जणांकडून परिसर विद्रुप केला जात आहे. सुशिक्षित लोकांनी कचरा, उचल करणाऱ्या कंत्राटदाराकडे द्यावा, असे आवाहन हरमलच्या सरपंच रजनी इब्रामपुरकर यांनी केले आहे.

कचरा व्यवस्थापन समिती ही पंचायत ग्रामसभेत निवडलेली समिती असून ही समिती केवळ कंत्राट देणे व व्यवस्था पाहणे इतके काम करीत असते. मात्र अन्य बाबतीत पंचायत समितीने जतिनिशी लक्ष द्यायला हवे, कोणीतरी मुद्दामहून पंचायतीला लक्ष्य करीत असल्याची चर्चा सुरू आहे.

गेले कित्येक दिवस हे प्रयत्न चालू असून गावच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे. ही जागा हरमल गावचे प्रवेशद्वार असून त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे, असे सरपंच इब्रामपुरकर यांनी म्हटले आहे.

harmal road garbage
Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

मांद्रेतील लोकांनी सहकार्य करावे

या वेशीवर कदाचित मांद्रेतील मंडळी कचरा टाकण्याचे काम करीत असावेत, अशी शंका आहे. वास्तविक मांद्रे पंचायत क्षेत्रात कंत्राटदार असून घरोघरी व आस्थपनाकडून कचऱ्याची उचल करीत असल्याचे समजते. त्यामुळे गावच्या स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com