Milagris Feast 2023: म्हापशात आजपासून ‘मिलाग्रीस’ फेस्त

यंदा 35 स्टॉलधारकांना परवानगी
Milagris Feast
Milagris FeastDainik Gomantak

Milagris Feast 2023: 24 एप्रिल रोजी अवर लेडी ऑफ मिलाग्रीसचे वार्षिक फेस्त साजरे करण्यात येणार आहे. म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर फेस्ताची फेरी व्यवस्थित पार पडण्यासाठी फेरीस्थळाची पाहणी केली.

यंदा 35 स्टॉलधारकांना परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी दिली.

सेंट जेरॉम चर्च म्हापसा यावर्षी 24 एप्रिल रोजी अवर लेडी ऑफ मिलाग्रीस फेस्त साजरा करेल. या फेस्तनिमित्त संपूर्ण गोव्यातील ख्रिश्चन व हिंदू दोन्ही भाविक चर्चस्थळी भेट देतात. याशिवाय फेस्तस्थळी भरणारी फेरी ही आकर्षणाचे केंद्रबिंदू असते.

Milagris Feast
CM Pramod Sawant: 'तरुणांनी केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून राहण्‍याची मानसिकता बदलावी'

या पाहणीवेळी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके, मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर, नगरसेवक चंद्रशेखर बेनकर, आशीर्वाद खोर्जुवेकर, पालिका निरीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. या फेरीसाठी स्टॉल उभारण्यासाठी आजपर्यंत 35 अर्ज प्राप्त झाले.

याशिवाय अनेक फर्निचर विक्रेत्यांनीही त्यांचे स्टॉल लावण्यास सुरवात केली आहे. या तपासणीदरम्यान अनेक स्टॉलधारकांनी आगाऊ स्टॉल उभारल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले व त्यांच्याकडून आगाऊ रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला.

पालिकेने स्टॉल मालकांकडून प्रती चौरस मीटर 25 रुपये आणि कचरा कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Milagris Feast
BJYM Goa गरिबांसाठी बांधून देणार चार घरे; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनानिमित्त गणवेश वाटप

तीन मेपर्यंत फेरी

नगराध्यक्षा मिशाळ म्हणाल्या, ज्यांनी परवानगीसाठी अर्ज केले आणि त्यानुसार, क्षेत्र चिन्हांकित करून त्यांना देण्यात आली. आम्ही सार्वजनिक नोटीस जारी केली आहे, ज्यात आमच्याकडे 24 एप्रिल ते 3 मेपर्यंत ही फेरी असेल.

सध्या भूमिगत केबल टाकण्याच्या कामामुळे रस्ते समतोल नसल्यामुळे फेस्ताच्या पार्श्वभूमीवर सध्या रस्त्यांच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. ते फेस्तापूर्वी पूर्ण होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com