Idol Found In River : हिंदु धर्मांच्या भावनांशी खेळू नये; वेलिंगकरांचा सरकारला इशारा

सांकवाळ येथे विजयादुर्गेची मूर्ती सापडली होती
Various hindu organisations meet at Sancaole
Various hindu organisations meet at SancaoleDainik Gomantak

सांकवाळ येथील फ्रंटीयर पीस ऑफ सांकवाळ या परिसरात झुआरी नदीमध्ये श्री विजयादुर्गा देवीची मूर्ती सापडली होती. या प्राचीन मूर्तीच्या दर्शनासाठी हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी श्रीविजयादूर्गा मंदिराच्या पुनर्निर्माण चळवळीचे अध्वर्यू डाॅ. कालिदास वायंगणकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी विविध हिंदू संघटनांची बैठक झाली.

या बैठकीत एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच श्रीविजयादूर्गा देवीच्या मूर्तीचे सांकवाळ येथे रितसर प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला. बैठकीस राष्ट्रीय बजरंग दलाचे राज्य अध्यक्ष नितीन फळदेसाई, भारतमाता की जय संघाच्या धर्मजागरण प्रकोष्टाचे प्रतिनिधी राजेंद्र वेलिंगकर व करणी सेनेचे गोवाप्रमुख संतोषसिंग राजपूत उपस्थित होते.

Various hindu organisations meet at Sancaole
Goa News : केरीत संरक्षक भिंत ठरतेय पांढरा हत्ती !

प्राचार्य सुभाष वेलिंगकर म्हणाले, "आतापर्यंत संपूर्ण गोव्यातून श्री विजयादुर्गा देवीच्या मुर्तीचे सुमारे दोन हजार भाविकांनी दर्शन घेतले असून 31 विविध हिंदू संघटनांनी देवीच्या श्रीक्षेत्र शंखावलीतच पुनर्प्रतिष्ठापनेच्या कार्यास पाठिंबा दिला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी मूर्ति २४ तासाच्या आत सरकारच्या ताब्यात द्यावी अशी बजावलेली नोटीस हा हिंदू धर्माच्या भावना व आस्था यात केला गेलेला हस्तक्षेप आहे. ही नोटीस त्वरित मागे घेतली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली."

"गेली 10 वर्षे सरकारच्या पुरातत्व खात्याने प्राचीन मंदिराच्या संरक्षित वारसास्थळ जागेत बाहेरील लोकांना हस्तक्षेप कसा करू दिला. वारसा अवशेष, मंदिराची प्राचीन तळी व विशाल वटवृक्ष कसे नष्ट करू दिले याचे पुरावे उपलब्ध आहेत. इतर धर्मांच्या भावना जसे गोवा सरकार जपत आहे तसे त्यांनी हिंदुच्याही भावना जपाव्यात. सरकारने हिंदू धर्मभावनेत हस्तक्षेप करू नये" अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com