Group Dance Competition : समूह नृत्य स्पर्धेत हेरंब नृत्य समूह विजेता

सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते विजेत्या बक्षीसे प्रदान करण्यात आली.
Group Dance Competition :
Group Dance Competition :Dainik Gomantak
Published on
Updated on

Group Dance Competition : आगोंद, तेंबेवाडा येथील नवरात्र उत्सवानिमित्त काणकोण कलाकार संघ व संतोषी माता मंदिर समितीच्या सहकार्याने आयोजित समूह नृत्य स्पर्धेत निराकार येथील हेरंब नृत्य समूह विजेता ठरला.

द्वितीय मल्लिकार्जुन महाविद्यालय व तृतीय बक्षिस नृत्यराणी नृत्य समूहाला प्राप्त झाले. सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते विजेत्या बक्षीसे प्रदान करण्यात आली.

तसेच वेशभूषा स्पर्धेत प्रथम नूपुर महाले, द्वितीय कवीश सावंत, तृतीय यशवी कोमरपंत तर उत्तेजनार्थ अथर्व प्रभुदेसाई, सनय कोमरपंत व अनायशा कोमरपंत यांना बक्षीसे देण्यात आली.

Group Dance Competition :
Nita Ambani Dance Video: कल्चरल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ,नीता अंबानींचा 'रघुपती राघव' गाण्यावर भन्नाट डान्स

यावेळी नगरसेविका नीतू देसाई व निर्मला कोमरपंत उपस्थित होत्या. तसेच अध्यक्ष मनुजा नाईक गांवकर, उपाध्यक्ष नारायण देसाई, खजिनदार सतीश देसाई, सचिव हरीश्चंद्र खोलकर, सुदेश भैरेली, अमरेश कोमरपंत आदींची उपस्थिती होती.

सुनय‌ कोमरपंत, अग्रज देसाई यांनी परिक्षण केले. अध्यक्षा नाईक गांवकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. रिया कोमरपंत, श्रीनिती देसाई, निलांगी भैरेली, कश्वी कोमरपंत, परिका कोमरपंत, किरण कोमरपंत यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सभापती रमेश तवडकर व नीतू देसाई यांनी यावेळी विचार मांडले. अध्यक्ष नाईक गांवकर यांच्या हस्ते मान्यवरांना मानचिन्हे भेट देण्यात आली. सूत्रसंचालन हरिश्चंद्र खोलकर, रिमा देसाई व मनोज नाईक गांवकर यांनी केले. सुदेश भैरेली यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com