Green Chilli Price Today : पणजी बाजारात गावठी मिरचीला मोठी मागणी

Green Chilli Price Today : पणजी बाजारातील दुकानांमध्ये तसेच काही स्थानिक शेतकऱ्यांकडून गावठी मिरचीची विक्री केली जाते. सध्या मिरची, लसूण, मसाले खरेदीला चांगली मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.
Green Chilli
Green Chilli Dainik Gomantak

Green Chilli Price Today :

पणजी, राज्यात पावसाळ्यासाठी लागणारे मिरची, मसाले तसेच इतर वाळवणे करण्याची लगबग सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात मिरची खरेदी केली जात आहे.

पणजी बाजारातील दुकानांमध्ये तसेच काही स्थानिक शेतकऱ्यांकडून गावठी मिरचीची विक्री केली जाते. सध्या मिरची, लसूण, मसाले खरेदीला चांगली मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.

राज्यात प्रामुख्याने नागरिक गावठी मिरचीची खरेदी करतात त्यासोबत कर्नाटकातून गोव्यात विक्रीसाठी येणारी प्रसिद्धी बेडगी, तेजी तसेच इतर प्रकारच्या मिरचीची खरेदी केली जात आहे. पणजी बाजारात गावठी मिरची ५०० ते ७०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

Green Chilli
Goa BJP slams K'taka CM: 'स्वत:च्या राज्यातील समस्यांकडे लक्ष द्या', गोवा भाजपने सिद्धरामय्यांवर टीका का केली?

त्यासोबतच बेडगी मिरची ३४० प्रती किलो, तेजा- ३२०, गुंटूर २४० तसेच इतर विविध प्रकारच्या मिरच्या विकल्या जात आहे. सर्वाधिक मागणी गावठी मिरचीला असून त्या खालोखाल बेडगी मिरची विकली जात आहे.

आंब्याची आवक वाढली

राज्यात आता आंब्याची आवक वाढली असल्याने मोठ्या प्रमाणात मानकुराद, हापूस, पायरी, शेंदूरी तसेच इतर प्रकारचे आंबे दाखल झाले आहे. आंब्यांची आवक वाढल्याने दरात देखील घट झाल्याने आता मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी करत आहेत. मध्यम आकाराचे मानकुराद हजार ते बाराशे रुपये डझन विक्री होत असून हापूस देखील ८०० ते हजार रुपये डझन दराने विकला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com