
पणजी: राज्यात सरकारच्या शिक्षण खात्याच्या ताब्यातील ८१० शाळांची दुरुस्ती काम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री (साबांखा) तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिलेल्या सूचनांनुसार तालुकास्तरावरील साबांखाच्या विभागीय कार्यालयांमार्फत शाळांची दुरुस्ती कामे हाती घेण्यात आली आहेत. उर्वरित १५ दिवसांत किरकोळ व महत्त्वाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण केली जाणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सरकारी शाळांची दुरुस्तीची कामे असल्याने हे खाते आता कामाला लागले आहे. शिक्षण खात्याकडून मिळालेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शाळांची अंतर्गत रचनाही केली जाणार आहे. अनेक शाळांमध्ये छतापासून पाण्याच्या व्यवस्थेपर्यंत आणि शौचालयापासून सुरक्षिततेपर्यंत समस्या आहेत. त्या समस्या दूर करण्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी छतांची दुरुस्ती करावयाची आहे, त्या शाळांची पूर्ण छत बदलाचे काम हाती घेण्यात आले आहे. अनेक शाळांमध्ये अंतर्गत किरकोळ दुरुस्त्या आहेत, ती कामेही आता मार्गी लागणार आहेत. अनेक शाळांच्या छतांची अवस्था दयनीय झाली होती. अजूनही कौलारू असणाऱ्या शाळांवरील कौल फुटलेले, तसेच काही शाळांचे सिमेंटचे स्लॅबचे काँक्रिट खराब झालेले आहेत.
अशा शाळांची दुरुस्ती होत असल्याने व रंगरंगोटी होणार आहे. याशिवाय शाळांमध्ये बैठक व्यवस्था व इतर आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. या कामांमुळे शाळांना आता नवे रूप धारण होणार आहे.
खालील आकडेवारी ही पूर्वीच्या शैक्षणिक वर्गानुसार होती, आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार शाळांची वर्गवारी बदलली जाणार आहे, त्यामुळे त्या आकडेवारीत बदल होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळांच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी सर्व कामगारवर्ग परराज्यातील आहे. कंत्राटदारांमार्फत हा कामगारवर्ग काम करीत आहे. स्थानिक गवंडी किंवा इतर कारागीर या दुरुस्तीच्या कामांवर नजरेस पडणे अशक्य आहे.
या सर्व शाळांची छोटी-मोठी कामे आहेत, ती कामे सर्वस्वी मार्गी लागावीत, यासाठी साबांखाचे अभियंते लक्ष ठेवून आहेत. त्याशिवाय शिक्षण खात्याकडून पंधरा दिवसाला झालेल्या कामांचा आढावा घेतला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.