Goa News : गोमंतकीय युवकांनी कष्टाला लाजू नये : विद्याधर वळवईकर

Goa News : पणजीत गेली आठ वर्षे स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे सुरू आहेत. शहरातील रस्त्यांच्या विकासाबरोबरच शहरातील गटार, सांडपाणी निचरा व्यवस्था, वीज, पाणीपुरवठा तसेच इतर पायाभूत सुविधांच्या विकासाचे एकत्रित काम सुरू आहे.
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News :

पणजी गोमंतकीयांना कष्टाची कामे जमत नाहीत. कष्टाची कामे करायला गोमंतकीय तरूण लाजतो, हे म्हणणे खोटं ठरवून विद्याधर वळवईकर तारी हे ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत चाललेल्या कामात सहभागी होऊन कृतीतून तरूणांपुढे आदर्श ठेवला आहे.

वळवईकर हे पणजी शहरात एके ठिकाणी रस्त्यावर पट्टा रंगवताना दिसले.

पणजीत गेली आठ वर्षे स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे सुरू आहेत. शहरातील रस्त्यांच्या विकासाबरोबरच शहरातील गटार, सांडपाणी निचरा व्यवस्था, वीज, पाणीपुरवठा तसेच इतर पायाभूत सुविधांच्या विकासाचे एकत्रित काम सुरू आहे.

या कामातील व्यवस्थापनात असलेल्या ढिसाळपणामुळे, खात्यांमधील आणि कंत्राटदारांतील असमन्वयामुळे कामे रखडत गेली अन् शहरवासीयांना त्याचा त्रास होऊ लागला. पण ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक आणि कामात अडथळ्यांच्या मानव निर्मित साऱ्या समस्यांना तोंड देत ‘स्मार्ट सिटी’च्या कामात हजारो हात गुंतले आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षापासून पेंटिंगचे काम करणारे विद्याधर वळवईकर तारी यांनी लेटरिंगच्या कामापासून व्यवसायाला सुरवात केली होती.

Goa
Sanquelim Goa: साखळी रस्त्यावर दरड कोसळण्याची भीती; पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी

‘डिजिटल’मुळे कामे घटली

पूर्वी हाताने फलक रंगवले जायचे, ज्यातून कलाकाराची कलाही दिसायची अन् कलाकाराला त्यातून अर्थार्जनही व्हायचे. पण सध्या ‘डिजिटल फ्लेक्स’ आल्यामुळे ‘लेटरिंग’च्या कामाला जणू एकदमच ब्रेक लागला.

डिजिटल फलकांमुळे गावोगावच्या फलक रंगवणाऱ्या कलाकारांच्या तोंडचा घासच पळवला,अशी खंत विद्याधर वळवईकर यांनी व्यक्त केली.सध्या रस्त्यावरच्या पट्टे रंगवण्याच्या कामात प्रत्येक फुटाला १० रुपये इतका दर मिळतो, असेही वळवईकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com