Vizzy Trophy 2023 : गोव्याच्या सोहमची पश्चिम विभाग संघात निवड

विझी ट्रॉफी : स्पर्धेसाठी निवड झालेला राज्यातील एकमेव क्रिकेटपटू
Soham Panwalkar
Soham PanwalkarDainik Gomantak
Published on
Updated on

Vizzy Trophy 2023 : गोव्याचा यष्टिरक्षक-फलंदाज सोहम पानवलकर याची विझी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय संघात तो निवड झालेला राज्यातील एकमेव क्रिकेटपटू आहे. आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीनुसार त्याची स्पर्धेसाठी निवड झाली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) विझी ट्रॉफी एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा घेतली जाते. यावेळची स्पर्धा छत्तीसगडमधील रायपूर येथे 9 ते 16 मार्च या कालावधीत होईल. स्पर्धेत पश्चिम विभागासह उत्तर, दक्षिण व पूर्व विभाग संघांचा सहभाग आहे.

राजस्थानमध्ये फेब्रुवारीत झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सोहमने गोवा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. त्या स्पर्धेत गोवा विद्यापीठाचे आव्हान उपांत्य फेरीत आटोपले.

Soham Panwalkar
ISL Football: मुंबई सिटीसमोर बंगळूरला रोखण्याचे आव्हान

विद्यापीठ स्पर्धेत शानदार फलंदाजी

सोहमन गोवा विद्यापीठातर्फे स्पर्धेत शानदार फलंदाजी करताना एका अर्धशतकासह 36.75च्या सरासरीने 147 धावा केल्या. जयपूरच्या मणिपाल विद्यापीठाविरुद्ध त्याने 55 धावांची खेळी केली. या धावा त्याने 28 चेंडूंत सात चौकार व तीन षटकारांच्या मदतीने केल्या. ग्वाल्हेरच्या एलएनआयपीई संघाविरुद्ध त्याने 43 धावांचे योगदान दिले.

Soham Panwalkar
दक्षिण गोव्यातील रस्ता अपघातांवर तोडगा काढा; Goa Pradesh Youth Congressची मागणी

गोव्याचे बीसीसीआय स्पर्धेत प्रतिनिधित्व

सोहमने बीसीसीआय वयोगट स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 2022-23 मोसमात तो 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळला.

त्यापूर्वी, 2021-22 मोसमातील कर्नल सी. के. नायडू करंडक 25 वर्षांखालील स्पर्धेत केरळविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात त्याने शतक (119) ठोकले होते.

आसगाव-बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या (डीएम्स) महाविद्यालयाचा तो तृतीय वर्ष बी. कॉम विद्यार्थी आहे. त्याला क्रिकेट प्रशिक्षक नितीन वेर्णेकर, हर्षद गडेकर यांचे, तसेच नरेश पार्सेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com