Disha Naik: आजच्या युगात महिला सर्व क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताहेत. फायर ब्रिगेडमध्ये यापुर्वी कधी महिला दिसत नव्हत्या. पण आता गोव्यातील एका युवतीने या क्षेत्रातही नाव कमावले आहे.
विशेष म्हणजे अग्निशमन बंबावर पाण्याची पाईप हाताळणारी ती पहिली प्रमाणित भारतीय महिला बनली आहे.
(First Certified Woman Firefighter to Drive Crash Fire Tender)
दिशा नाईक असे या युवतीचे नाव आहे. दिशा क्रॅश फायर टेंडर ऑपरेट करणारी भारतातील पहिली प्रमाणित महिला अग्निशामक बनली आहे. एअरपोर्ट रेस्क्यू अँड फायरफायटिंग क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे कौतुक होत आहे.
दिशा सध्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (MIA) च्या एअरोड्रोम रेस्क्यू अँड फायर फायटिंग (ARFF) युनिटमध्ये कार्यरत आहे. क्रॅश फायर टेंडर ऑपरेट करणारी ती भारताची पहिली प्रमाणित महिला अग्निशामक बनली आहे.
दिशा यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये मनोहर विमानतळ येथे बचाव आणि अग्निशमन विभागात पदासाठी अर्ज केला होता. त्यानंतर अथक समर्पणामुळे तिला सर्व पूर्वतयारी पूर्ण करता आली. आणि आता ती अधिकृतरित्या या विभागात रुजू झाली आहे.
तिने विमान बचाव आणि अग्निशमनासाठी डिझाइन केलेले क्रॅश फायर टेंडर चालवण्यात स्वारस्य दाखवले होते.
त्यानंतर तिने नमक्कल, तामिळनाडू येथे सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे. तिला आता गोव्यातील पहिली प्रमाणित महिला अग्निशामक म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.