London: लंडनमध्ये मैत्रिणीच्या खून प्रकरणात गोव्यातील तरुण दोषी; पार्टनर आहे कळताच काढला काटा

हेरगिरी करण्यासाठी त्याने विविध उपरकरणं वापरली होती हे देखील तपासातून समोर आले आहे.
London Crime Story Goa Connection
London Crime Story Goa ConnectionDainik Gomantak
Published on
Updated on

London Crime Story Goa Connection: लंडनमध्ये मैत्रिणीच्या खून प्रकरणात गोव्यातील तरूण दोषी आढळला आहे. शेल्डन रॉड्रिग्स याने डिसेंबर 2022 मध्ये पश्चिम लंडनमधील हेस येथे स्टेफनी हॅन्सनचा खून केला.

शेल्डन आणि स्टेफनी एकत्र राहत होते. शेल्डनने हेरगिरी करुन मैत्रिणीचा खून केल्याचे सिद्ध झाले आहे. हेरगिरी करण्यासाठी त्याने विविध उपरकरणं वापरली होती हे देखील तपासातून समोर आले आहे. बीबीसीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

रॉड्रिग्स मागील सात वर्षापासून स्टेफनी हॅन्सनच्या मागावर होता. स्टेफनीच्या प्रेमात असलेला रॉड्रिग्स शस्त्रक्रिया करुन स्वत:चे रंगरुप देखील बदलण्यासाठी तयार झाला होता, असे एका स्थानिक वर्तमान पत्राने म्हटले आहे.

रॉड्रिग्स स्टेफनीवर पाळत ठेवत होता, त्यासाठी त्याने घरात टेलिव्हिजनमध्ये ऑडिओ रेकॉर्डर ठेवला होता. रॉड्रिग्सने तब्बल 158 तास स्टेफनीचे संवाद गुप्तपणे ऐकल्याचे तपासातून समोर आले आहे.

हिथ्रो विमानतळाजवळील एका कार्गो कंपनीत रॉड्रिग्स रात्रपाळीत काम करत होता. तो घरात नसताना स्टेफनीचा प्रियकर तिला भेटायला घरी आला होता, हे कळाल्यानंतर त्याने घरी आल्यानंतर बेडरुममध्ये असणाऱ्या स्टेफनीवर हल्ला केला.

स्टेफनीच्या शरीरावर सुमारे 60 ठिकाणी व्रण आढळून आले आहेत. यात त्याने चाकूने देखील वार केल्याचे समोर आले आहे, याशिवाय हेअर ड्रायर, पंख्याचा देखील वापर झाल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, रॉड्रिग्सने घरात लावलेले रेकॉर्डिंग डिव्हाईस तिच्या सुरक्षेसाठी लावले होते असे स्पष्टीकरण कोर्टाला दिले. त्याने हत्येचा संशय स्टेफनीच्या प्रियकराकडे देखील वळविण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com